Join us  

'उरी' चित्रपट माझ्या करियरमधील खास चित्रपट - यामी गौतम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 3:30 PM

अभिनेत्री यामी गौतम नुकतीच शाहिद कपूरसोबत 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपटात दिसली होती. आता ती 'उरी' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्दे 'उरी'मध्ये विक्की कौशल एका भारतीय कमांडोच्या भूमिकेत 'उरी' चित्रपटाबाबत यामी खूप उत्सुक

छोट्या पडद्यावरील जाहिरातींतून आपल्या करियरला सुरूवात करणारी अभिनेत्री यामी गौतम नुकतीच शाहिद कपूरसोबत 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपटात दिसली होती. आता ती 'उरी' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटाबाबत ती खूपच उत्सुक असून ती म्हणाली की, ''उरी' चित्रपट तिच्या करियरमधील खास चित्रपट आहे.'

'कारगिल- एलओसी', 'बॉर्डर' आणि 'लक्ष्य'सारख्या सिनेमांमध्ये भारतीय लष्कराची शौर्यगाथा पडद्यावर मांडण्यात आली. त्यात जवानांच्या धैर्याचे आणि शौर्याबरोबरच विजय मिळवण्याच्या निर्धाराचेही दर्शन घडले. मात्र प्रत्यक्ष शत्रूच्या गोळीबारात मरण पावलेल्या जवानांच्या वेदनादायी प्रसंगांना आतापर्यंत पडद्यावर आणले नव्हते. ते आता 'उरी'मधून पाहायला मिळणार आहे. उरी येथे झालेल्या दहशतवादी विषयी प्रत्येकजण जाणून आहे. या अटॅकमध्ये देशातील अनेक जवान शहीद झाले होते. आता याची कथा प्रेक्षकांना पडद्यावर बघण्यास मिळणार आहे. यात विक्की कौशल आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'उरी'चा टीझर पाहायला मिळाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी यामी फारच उत्सुक आहे. हा चित्रपट तिच्या करिअरमधला खास चित्रपट आहे. यावर ती म्हणाली, 'माझ्या करियरमधील सर्वात खास चित्रपटांपैकी एक उरी चित्रपट असून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला हा चित्रपट दाखवायला हवा.'दिग्दर्शक आदित्य धर आणि विक्की कौशल यांनी यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. उरीमध्ये विक्की कौशल एका भारतीय कमांडोची भूमिकेत दिसणार आहे. तसेच यात किर्ती कुलहरी आणि परेश रावल हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ११ जानेवारी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :यामी गौतमउरी