Join us  

Udita Goswami बॉलिवूडमधून आहे गायब; आता तिला ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 4:08 PM

उदिता गोस्वामी (Udita Goswami) तिच्या बोल्डनेस आणि हॉट सीन्समुळे खूप चर्चेत राहिली. पण 'पाप' आणि 'जहर' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी उदिता रुपेरी पडद्यापासून दूर गेली.

बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यावर यश मिळवणे आणि अग्रेसर स्थानी पोहोचणे सोपे नाही. पण काही स्टार्स असे आहेत जे पहिल्याच चित्रपटातून लोकांची मने जिंकण्यात आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. या यादीतील असेच एक नाव आहे अभिनेत्री उदिता गोस्वामी (Udita Goswami). जिने मोजक्याच चित्रपटातून स्वतःला बॉलिवूडची अव्वल अभिनेत्री म्हणून सिद्ध केले. उदिता तिच्या बोल्डनेस आणि हॉट सीन्समुळे खूप चर्चेत राहिली. पण 'पाप' आणि 'जहर' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी उदिता रुपेरी पडद्यापासून दूर गेली. देहरादूनमध्ये ९ फेब्रुवारीला जन्मलेली उदिता ३७ वर्षांची झाली आहे. बॉलिवूडच्या हॉट आणि सेक्सी हिरोइन्सचा विचार केला तर त्यात उदिता गोस्वामीचं नाव येत नाही असं होऊ शकत नाही. त्यांनी मोजक्याच चित्रपटांसह बड्या अभिनेत्रींना स्पर्धा दिली होती. उदिता आणि सीरियल किसर इमरान हाश्मीच्या जोडीने अनेक हॉट सीन्स दिले आहेत. पण खऱ्या आयुष्यात ती इमरानची वहिनी आहे. 'जहर' चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी होते. या चित्रपटानंतर दोघांच्या अफेअरच्या बातम्या सुरू झाल्या. दिग्दर्शक मोहित सुरीसोबत ९ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर उदिताने २०१३ मध्ये लग्न केले. मोहित सुरी आणि इमरान हाश्मी चुलत भाऊ आहेत.

उदिता २००६ मध्ये आलेल्या 'अक्सर' चित्रपटात इमरान हाश्मीसोबत पुन्हा दिसली. दोघांनी बॉलिवूडमध्ये इतके बोल्ड सीन्स दिले की आजही त्यांचा समावेश हॉट सीन्सच्या यादीत होतो. ती शेवटची २०१२ मध्ये आलेल्या डायरी ऑफ बटरफ्लाय या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. उदिता गोस्वामी सध्या सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि ती तिचे लेटेस्ट फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. नुकताच तिने काही फोटो शेअर केले आहेत. मुलांचे संगोपन करण्यासोबतच ती तिच्या करिअरवर लक्ष देत आहे. ती सध्या बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरी ती देशातील एक प्रसिद्ध डिस्क जॉकी म्हणून नाव कमावत आहे.

टॅग्स :मोहित सुरीइमरान हाश्मी