Join us  

Uday Chopra : चित्रपटापासून दूर राहूनही कोट्यवधींची कमाई करतो उदय चोप्रा, जाणून घ्या त्याच्या कमाईचा सोर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 1:11 PM

एक अभिनेता म्हणून उदय चोप्राच्या कारकीर्द फारशी यशस्वी राहिली नाही. परंतु कमाई आणि संपत्तीच्या बाबतीत तो भल्याभल्याना मागे टाकतो

बॉलिवूड अभिनेता उदय चोप्रा आज ५ जानेवारीला आपला ५० वा वाढदिवस साजरा करतो आहे. पडद्यावर मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसलेला उदय चोप्रा 'मोहब्बतें', 'दिल बोले हडिप्पा', 'कल हो ना हो', 'धूम' अशा काही निवडक चित्रपटांमध्ये साईड हिरोच्या भूमिकेत दिसला आहे. एक अभिनेता म्हणून उदय चोप्राच्या कारकिर्द फारशी यशस्वी राहिली नाही. परंतु कमाई आणि संपत्तीच्या बाबतीत तो भल्याभल्याना मागे टाकतो. अभिनयासोबतच उदयने सहाय्यक दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणूनही काम केले आहे. 'मोहब्बतें'मध्ये दिसलेल्या उदय चोप्राची संपत्ती आणि नेटवर्थ थक्क करणार आहे.

मुंबईत 5 जानेवारी 1973 रोजी  जन्मलेला उदय चोप्रा हा बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मुलगा आहे. मुंबईतील त्याच्या सुरुवातीच्या शिक्षणानंतर, ते लॉस एंजेलिसला शिफ्ट झाला, तिथे त्यांने कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत एडमिशन घेतलं. तेथून ग्रॅज्युएशन केल्यानंतर तो मुंबईत परतले आणि त्यांने चित्रपटांमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न केला. उदयने त्याच्या वडिलांच्या चित्रपटांवर (लम्हें, परंपरा, डर) सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

यशराज फिल्म्सचा आहे मालकउदय चोप्रा कदाचित मुख्य अभिनेता म्हणून पडद्यावर दिसला नसेल, पण तो इंडस्ट्रीतील यशस्वी लोकांपैकी एक आहे. मात्र, अनेक प्रश्न नेहमीच उदयभोवती फिरत असतात. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता असण्यासोबतच उदय अनेक वेगवेगळ्या बिझनेसचाही एक भाग आहे. त्याचा भाऊ आदित्य चोप्रा सोबत, तो YRF एंटरटेनमेंट आणि यशराज फिल्म्स (Yash Raj Films)चा मालक आणि मॅनेजर देखील आहे.

याशिवाय, उदय एका कॉमिक बुक कंपनी(Yomics World)चा मालक आहे, जो यशराज फिल्म्स स्टुडिओचा एक भाग आहे. हे कॉमिक्स प्रिंट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.  उदय चोप्राने जुलै २०१२ मध्ये मुंबईत याचं उद्घाटन केले.

उदयने केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही नशीब आजमावला आहे. त्यांने ग्रेस ऑफ मोनॅको आणि द लॉन्गेस्ट वीक या दोन हॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली आहे. रिपोर्ट्सनुसार, उदयच्या नेट वर्थबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्याकडे सुमारे 50 लाख डॉलर्स (सुमारे 41 कोटी 35 लाख 50 हजार) असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :उदय चोप्रायश चोप्रा