Join us  

ट्विंकल खन्ना सांगतेय, माझ्या निधनानंतर करा ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 9:00 PM

ट्विंकलने इन्स्टाग्रामवर नुकताच एक तिचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत तिच्या निधनानंतर तिची एक इच्छा सगळ्यांनी पूर्ण करावी असे लिहिले आहे.

ठळक मुद्देमी आशा व्यक्त करते की, माझे निधन झाल्यानंतर हा फोटो मोठा करून त्याभोवती एक फॅन्सी फ्रेम लावली जाईल आणि त्या फोटोच्या भोवती गुलाबाच्या माळा घातलेल्या असतील आणि लोक या फोटोवर फुले टाकतील... माझ्या प्रार्थना सभेत सहभागी होतील. 

ट्विंकल खन्नाने आजवर जान, मेला, बादशहा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्न केल्यापासून ती अभिनयक्षेत्रापासून दूर झाली. पण आज तिने एक प्रसिद्ध लेखिका म्हणून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच तिने पॅडमॅन सारख्या एका वेगळ्या विषयावरच्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ट्विंकल अभिनयापासून दूर असली तरी तिच्या लेखनामुळे आणि विचारांमुळे तिचे फॅन फॉलोव्हिंग प्रचंड आहे आणि तिचे फॅन्स तिला सोशल नेटवर्किंग साईटवर नेहमीच फोलो करत असतात. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो पोस्ट करून तिची एक विचित्र इच्छा व्यक्त केली आहे. तिच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

ट्विंकलने इन्स्टाग्रामवर नुकताच एक तिचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत तिच्या निधनानंतर तिची एक इच्छा सगळ्यांनी पूर्ण करावी असे लिहिले आहे. ट्विंकलने पोस्ट केलेला हा फोटो ब्लँक अँड व्हाईट असून ती लोकांना या फोटोद्वारे घाबरवताना दिसत आहे आणि तिच्यामागे धोका... दूर राहा असे लिहिले आहे. या फोटोसोबत तिने पोस्ट लिहिली आहे. तिने त्यात म्हटले आहे की, तुम्हाला सगळ्यांना माझा हा नवीन फोटो नक्कीच आवडेल. मला खरे काय बोलायचे आहे हे खूपच कमी फोटोग्राफर्स त्यांच्या फोटोमध्ये कॅप्चर करतात. या फोटोत अगदी तंतोतत माझ्या भावना दिसत आहेत. मी आशा व्यक्त करते की, माझे निधन झाल्यानंतर हा फोटो मोठा करून त्याभोवती एक फॅन्सी फ्रेम लावली जाईल आणि त्या फोटोच्या भोवती गुलाबाच्या माळा घातलेल्या असतील आणि लोक या फोटोवर फुले टाकतील... माझ्या प्रार्थना सभेत सहभागी होतील. 

ट्विंकलने शेअर केलेला हा फोटो आणि त्याच्यासोबतचा संदेश तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. या फोटोला लाखोहून अधिक लोकांनी लाईक केले असून अशाप्रकारे इच्छा केवळ तूच व्यक्त करू शकतेस असे तिचे फॅन्स तिला प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत.

टॅग्स :ट्विंकल खन्ना