Join us  

OMG!! - म्हणून ट्विंकल खन्नाने लपवला चेहरा, करणार मोठा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 11:17 AM

मीडियासोबत लपंडाव खेळतानाचा ट्विंकलचा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय.

ठळक मुद्देट्विंकलने एक अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीला केव्हाच रामराम ठोकला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना तशी स्वभावाने अगदीच बिनधास्त. परखड बोलण्यासाठीच नव्हे तर तिच्या ‘बेफिक्रे’ स्वभावासाठीही ती ओळखली जाते. पण अलीकडे तिच्या या स्वभावाच्या अगदी विपरीत घडले. होय, मीडियाला पाहून ट्विंकल चेहरा कागदाने लपवताना दिसली आणि सगळीकडे याचीच चर्चा रंगली. मीडियासोबत लपंडाव खेळतानाचा तिचा हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय.या व्हिडीओत ट्विंकल एका स्टुडिओबाहेर पडताना दिसतेय. ट्विंकल बाहेर येताच मीडियाचे कॅमेरे सरसावतात. पण मीडियाचे कॅमेरे बघून ट्विंकल आपला चेहरा एका कागदाने लपवते. गाडीत बसेपर्यंत ती आपला चेहरा लपवून धरते.

ट्विंकलचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी वेगवेगळे तर्कवितर्क काढले. होय, काहींच्या मते ती मेकअप करणे विसरली. तर काहींच्या मते, कोरोना व्हायरसमुळे   तिने आपला चेहरा लपवला. एकंदर काय तर लोकांनी वाट्टेल ते अंदाज बांधले. पण आता ट्विंकलनेच यामागचे खरे कारण सांगितले आहे.

होय, ट्विंकलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत, चेहरा लपवण्यामागचे कारण सांगितले. सोबत एका नव्या प्रोजेक्टचे संकेतही दिलेत. ‘मी काही नवे करण्यासाठी माझ्या भुवया वाढवतेय. एका मोठा खुलाशाची प्रतीक्षा करा,’ असे तिने लिहिले.आता ट्विंकलचा हा नवा खुलासा काय हे लवकरच करेल, तोपर्यंत साहजिकच प्रतीक्षा...

ट्विंकलने एक अभिनेत्री म्हणून तिच्या कारकिर्दीला केव्हाच रामराम ठोकला आहे. पण एक लेखिका म्हणून तिने आज तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. आज घर आणि करियर या दोन्ही गोष्टी ती खूपच चांगल्याप्रकारे सांभाळत आहे. 

टॅग्स :ट्विंकल खन्ना