Join us  

या फोटोत दिसतायेत बॉलिवूडमधील दोन अभिनेते, ओळखा पाहू कोण आहेत ते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2021 12:55 PM

बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ठळक मुद्देतुषारने शेअर केलेल्या या फोटोत शोभा कपूर तुषारला केक भरवताना दिसत आहेत. पण या केकमध्ये तुषारच्या बालपणाच्या फोटोपेक्षा एका दुसऱ्याच अभिनेत्याची अधिक चर्चा रंगली आहे. या फोटोत आपल्याला चिमुकला हृतिक रोशन दिसत आहे.

तुषार कपूर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याने त्याच्या आईच्या म्हणजेच शोभा कपूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोसोबत त्याने आईला शुभेच्छा दिल्या आहेत.

तुषारने शेअर केलेल्या या फोटोत शोभा कपूर तुषारला केक भरवताना दिसत आहेत. पण या केकमध्ये तुषारच्या बालपणाच्या फोटोपेक्षा एका दुसऱ्याच अभिनेत्याची अधिक चर्चा रंगली आहे. या फोटोत आपल्याला चिमुकला हृतिक रोशन दिसत आहे. नेटिझन्सने या फोटोत हृतिक रोशनला ओळखलं असून तो या फोटोत खूपच छान दिसत आहे असे कमेंटद्वारे सांगत आहेत. तसेच या फोटोत हृतिकला तुषारने टॅग करावे असे त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

तुषारचे वडील जितेंद्र आणि हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. काही दिवसांपूर्वी देखील हृतिक आणि तुषारचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात ट्विंकल, हृतिक रोशन, सुनैना रोशन, तुषार कपूर, एकता कपूर हे सगळे दिसत होते.  

 अभिनेता तुषार कपूर आणि कॉमेडी सिनेमा असं गेल्या काही वर्षांपासून समीकरणच झालंय. 'गोलमाल' सिरीजमध्ये तर तुषारनं साकारलेली मुक्याची भूमिका रसिकांना भावलीय. तुषारने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये त्याचे स्थान निर्माण केले आहे तर एकता कपूरने एक निर्माती म्हणून बॉलिवूडला एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. 

हृतिक रोशनने कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे एक नायक म्हणून चित्रपटसृष्टीत एंट्री केली. हृतिकचा हा पहिला चित्रपट असला तरी या चित्रपटात त्याने रोहित आणि राज अशा दोन वेगवेगळ्या भूमिका खूपच चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या. या पहिल्याच चित्रपटासाठी हृतिकला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हृतिक रोशनने कोई मिल गया, क्रिश, काबील, धुम, जोधा अकबर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या दिसण्यावर तर मुली फिदा आहेत. बॉलिवूडमधील हँडसम अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते.

टॅग्स :हृतिक रोशन