Join us

‘मोहेंजोदाडो’ च्या शीर्षक गीतात आदिवासी डान्सिंगचा फ्लेव्हर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 12:33 IST

‘मोहेंजोदाडो’ चित्रपटातील ‘तू हैं’ गाण्यानंतर आता शीर्षक गीत आऊट करण्यात आले आहे. या गाण्यात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह दिसून येतो. या गाण्यात आदिवासी डान्सिंगचा फ्लेव्हर अत्यंत उत्कृष्टप्रकारे सादर करण्यात आला आहे.

 ‘मोहेंजोदाडो’ चित्रपटातील ‘तू हैं’ गाण्यानंतर आता शीर्षक गीत आऊट करण्यात आले आहे. या गाण्यात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर  आनंद, उत्साह दिसून येतो. या गाण्यात आदिवासी डान्सिंगचा फ्लेव्हर अत्यंत उत्कृष्टप्रकारे सादर करण्यात आला आहे.संपूर्ण मोहेंजोदाडो हे संपूर्ण शहर एकत्र येऊन एखादा सण असल्याप्रमाणे गाणे गाऊन तो क्षण साजरा करत आहेत. ए.आर.रहमान, अरिजित सिंग, बेला शेंडे, सनाह मोईड्यटी यांनी हे गाणे गायले आहे.पूजा हेगडे हिच्या सौंदर्यावर हृतिक रोशन भाळलेला यात दिसतो. शहरातील लोकांसोबत डान्स करताना तो दिसतोय. वेल, हे गाणे इतके सुंदर आहे की, प्रत्येकाला नाचवेल.">http://