अनोख्या अंदाजात लॉन्च झाला ‘बागी2’चा ट्रेलर! टायगर श्रॉफचे ‘deadly stunts’ पाहून व्हाल थक्क!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 15:43 IST
अखेर ‘बागी2’चा ट्रेलर लॉन्च झाला. कालपासून प्रेक्षक या ट्रेलरकडे डोळे लावून बसले होते. याला कारणही तसेच होते. कारण अगदी अनोख्या पद्धतीने हा ट्रेलर लॉन्च होणार होता आणि झालेही अगदी तसेच.
अनोख्या अंदाजात लॉन्च झाला ‘बागी2’चा ट्रेलर! टायगर श्रॉफचे ‘deadly stunts’ पाहून व्हाल थक्क!!
अखेर ‘बागी2’चा ट्रेलर लॉन्च झाला. कालपासून प्रेक्षक या ट्रेलरकडे डोळे लावून बसले होते. याला कारणही तसेच होते. कारण अगदी अनोख्या पद्धतीने हा ट्रेलर लॉन्च होणार होता आणि झालेही अगदी तसेच. ‘बागी2’मध्ये मुख्य भूमिकेत असलेला टायगर श्रॉफ आणि त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड व या चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस दिशा पटनी यांनी अनोख्या पद्धतीने या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला. होय, एका हेलिकॉप्टरमधून टायगर व दिशा ट्रेलर लॉन्चच्या इव्हेंटला पोहोचले. मुंबईच्या पोलो ग्राऊंडवर हे हेलिकॉप्टर उतरले. यादरम्यान टायगर व दिशा दोघेही कॅमेºयासमोर अॅक्शन करताना दिसले. यावेळी दिशा व टायगरचा स्पोर्टी लूक चांगलाच लक्षवेधी ठरला. टायगर यावेळी पांढरा शर्ट आणि ट्राऊजरमध्ये दिसला तर दिशा पांढºयाच रंगाचा टॉप आणि मिल्ट्री प्रिंन्टच्या ट्राऊजरमध्ये दिसली. यानंतर मुंबईच्या लोअर परेलच्या पीव्हीआरमध्ये ट्रेलर लॉन्च झाला. ‘बागी2’च्या ट्रेलरमध्ये टायगरचा अॅक्शन अवतार बघण्यासारखा आहे. याशिवाय दिशा अन् टायगरचा रोमान्सही डोळ्यांत भरणारा आहे. मनोज वाजपेयी, रणदीप हुड्डा यांची एक झलकही या ट्रेलरमध्ये दिसते आहे. टायगरची एक एक किक, एक एक पंच पाहण्यासारखा आहे. टायगरचे चाहते असाल तर हा ट्रेलर तुम्ही न चुकवलेलाच बरा. ALSO READ : OMG! टायगर श्रॉफवर गर्लफ्रेन्ड दिशा पटनीने लादले अनेक कडक नियम!!‘बागी2’ हा चित्रपट येत्या ३० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. गतवर्षी आलेल्या ‘बागी’चा हा सीक्वल आहे. ‘बागी’मध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. पण ‘बागी2’ श्रद्धाची जागा दिशाने घेतली. ‘बागी’ हा चित्रपट साबीर खानने दिग्दर्शित केला होता. ‘बागी2’ मात्र अहमद खानने दिग्दर्शित केला आहे. ‘बागी2’मध्ये टायगर श्रॉफ व त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटनी हे दोघे प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. कॉलेजपासून सुरू होणाºया या लव्हस्टोरीत अनेक टिष्ट्वस्टही बघायला मिळणार आहे. टायगरऐवजी दिशाचे दुसºया तरूणासोबत विवाह होतो. मध्यंतरानंतर दिशाच्या पतीचा मृत्यू होतो. तिचीही हत्या होते आणि तिच्या मुलाचे अपहरण केले जाते. यानंतर टायगर या मुलाला वाचवतो, असे याचे कथानक असल्याचे कळतेय.