Join us

प्रसिद्ध फॅशन डिझायनर संशयास्पद मृत्यू; घरात आढळलं कार्बन मोनोऑक्साइड सिलेंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 22:02 IST

३५ वर्षीय फॅशन डिझायनर प्रत्युषा बंजारा हिल्स पोलीस स्टेशन हद्दीतील फिल्म नगरमध्ये एका घरात राहत होती.

हैदराबाद - प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेलाचा(Prathyusha Garimela) संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. बंजारा हिल्स येथील राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळली. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी माहिती दिली आहे की, डिझायनरच्या बेडरूममधून कार्बन मोनोऑक्साइड देखील जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयास्पद मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला आहे.

बाथरूममध्ये मृतदेह सापडला३५ वर्षीय फॅशन डिझायनर प्रत्युषा बंजारा हिल्स पोलीस स्टेशन हद्दीतील फिल्म नगरमध्ये एका घरात राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी जेव्हा तिने सुरक्षा रक्षकाला प्रतिसाद दिला नाही, तेव्हा त्याच्या रक्षकांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तिथे डिझायनरचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला.

स्वतःच्या नावाने बनवलेला ब्रँड'प्रत्युषा गरिमेला' नावाचा कपड्यांचा ब्रँड म्हणून प्रत्युषाचे स्वतःचे फॅशन लेबल आहे. त्याचे फ्लॅगशिप स्टोअर हैदराबाद, मुंबई येथे आहे. याशिवाय डिझायनर्सनीही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांचे डिझाइन शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने डिझाईन केलेले बहुतांश पोशाख भारतीय शैलीतील आहेत.