Join us

बॉलिवूडमधील टॉप 5 दहीहंडी गीते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 09:46 IST

जाणून घ्या बॉलिवूडमधील टॉप 5 दहीहंडी गीते

बॉलिवूडमधील गाणी आणि गोकुळाष्टमी यांचे खूपच जवळचे नाते आहे. गोकुळाष्टमी म्हटली की, हिंदी चित्रपटातील काही गाणी आपल्याला आवर्जून ऐकायला मिळतातच... जाणून घेऊया बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध दहीहंडीची गीते...मच गया शोरकुदरत या चित्रपटातील मच गया शोर हे गाणे आपल्याला दहीहंडी सेलिब्रेशनमध्ये आवर्जून ऐकायला मिळते. या गाण्यात अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी आपल्याला पाहायला मिळाले होते. या गाण्यातील अमिताभ यांच्या नृत्यावर तर सगळेच फिदा आहेत.गो गो गो गोविंदाओह माय गॉड या चित्रपटातील सोनाक्षी सिन्हा आणि प्रभुदेवा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले गो गो गो गोविंदा हे गाणे चांगलेच फेमस आहे. या गाण्याचे संगीत, या गाण्यातील बोल आणि विशेष म्हणजे या गाण्यावर सोनाक्षी आणि प्रभुदेवा यांनी केलेले नृत्य अफतालून आहे.गोविंदा आला रे आला ब्लफमास्टर चित्रपटातील गोविंदा आला रे आला हे गाणं आज इतकी वर्षं झाले तरी ते ताजे आहे. हा चित्रपट १९६३मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आज इतक्या वर्षांनी देखील हे गाणे गोकुळाष्टमीच्या सेलिब्रेशनच्या वेळी नक्कीच ऐकायला मिळते. या गाण्यात शम्मी कपूर यांनी केलेल्या नृत्यावर तर रसिक आजही फिदा आहेत.चांदी की डाल पर सलमान खान एक चांगला अभिनेता असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्याचसोबत तो एक चांगला गायक असल्याचे त्याने हॅलो ब्रदर या चित्रपटाद्वारे सिद्ध केले. चांदी की डाल पर हे हॅलो ब्रदर या चित्रपटातील गाणे त्याने गायले होते. त्याच्या कारकिर्दीतील हे पहिलेच गाणे असले तरी प्रेक्षकांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतले होते. शोर मच गया शोर देखो आया माखन चोरबदला या चित्रपटात शत्रुघ्न सिन्हावर चित्रीत करण्यात आलेले शोर मच गया शोर देखो आया माखन चोर हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडते. शत्रुघ्न सिन्हाचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना या गाण्यात पाहायला मिळाला होता.