Join us  

विद्या सिन्हा यांना अखेरच्या क्षणी भेडसावत होती मुलीची चिंता, बँकेत आहेत केवळ 5 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:56 PM

‘रजनीगंधा’ या चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे काल निधन झाले. विद्या सिन्हा यांचे फिल्मी करिअर शानदार राहिले. पण ख-या आयुष्यात मात्र अखेरपर्यंत ताणतणाव सहन करावा लागला.

ठळक मुद्देपतीच्या निधनानंतर 2001 मध्ये विद्या यांनी ऑस्ट्रेलियात स्थायिक नेताजी भीमराव साळुंखे यांच्याशी दुसरा विवाह केला.

‘रजनीगंधा’ या चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे काल निधन झाले. विद्या सिन्हा यांचे फिल्मी करिअर शानदार राहिले. पण ख-या आयुष्यात मात्र अखेरपर्यंत ताणतणाव सहन करावा लागला. 1968 मध्ये विद्या यांनी व्यंकटेश्वरम अय्यर यांच्यासोबत लग्न केले. पण 1996 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. याकाळात विद्या यांनी एका मुलीला दत्तक घेतले होते. तिचे नाव जान्हवी अय्यर. विद्या व जान्हवी दोघीही एकमेकींच्या अतिशय जवळ होत्या. पण आपल्या माघारी जान्हवीचे कसे होईल, ही चिंता त्यांना भेडसावत होती. 

स्पॉटबॉयशी बोलताना अभिनेत्री आणि सिन्टाच्या झोनल हेड टीना घई यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विद्याचे जान्हवीवर प्रचंड प्रेम होते. तिची त्यांना सतत चिंता असे. विद्या रूग्णालयात भरती असताना मी त्यांना भेटायला गेले होते. यावेळी त्या केवळ जान्हवीबद्दल बोलत होत्या. माझ्या मृत्यूनंतर माझी मुलगी जान्हवीचे काय होईल, याची त्यांना चिंता होती. विद्या यांचा दुसरा पती नेताजी भीमराव साळुंखेचा विद्याच्या फ्लॅटवर डोळा आहे. यामुळे विद्या चिंतेत होत्या. विद्या यांची आर्थिक स्थिती फार चांगली नव्हती. त्यांच्या बँक खात्यात केवळ 5 लाख रूपये शिल्लक होते.

 चित्रपटात येण्यापूर्वीच विद्या सिन्हा यांनी प्रेमविवाह केला होता. 1968 मध्ये व्यंकटेश्वरम अय्यर यांच्याशी त्यांनी लग्न केले. पण 1996 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले.  

पतीच्या निधनानंतर 2001 मध्ये विद्या यांनी ऑस्ट्रेलियात स्थायिक नेताजी भीमराव साळुंखे यांच्याशी दुसरा विवाह केला. असे म्हणतात की, इंटरनेटवर विद्या नेताजी भीमराव साळुंखेच्या प्रेमात पडल्या होत्या. लग्नानंतर विद्या त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यात. पण काहीच महिन्यांत पतींकडून त्यांच्या छळाच्या बातम्या येऊ लागल्या. पैशांसाठी दुसरा पती विद्यांचा छळ करू लागला होता. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांना मारहाण करू लागला होता. विद्या यांनी या स्थितीचा खंबीरपणे सामना केला आणि पतीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर काहीच महिन्यांत त्यांनी दुसºया पतीपासून घटस्फोट घेतला होता. 

टॅग्स :विद्या सिन्हा