Join us  

Morning Jogs : टायगर श्रॉफचे चाहते आहात? तर मग हा  ३० सेकंदाचा व्हिडीओ नक्की पाहा!! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2019 8:00 AM

या व्हिडीओत टायगर पोर्तुगालमध्ये मॉर्निंग जॉगिंग करताना दिसतोय. मॉर्निंग जॉग्स इन पोर्तुगाल, असे टायगरने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे.

ठळक मुद्देतूर्तास टायगर ‘बागी 3’ या चित्रपटाची तयारी करतोय.

नुकताच टायगर श्रॉफ ‘स्टुडंट आॅफ द इअर’मध्ये दिसला. सध्या टायगर काय करतोय? असा तुमचा प्रश्न असेल तर मॉर्निंग जॉगिंग करतोय, असेच उत्तर आम्ही देऊ. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे. सध्या टायगरचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओतील टायगरचा अंदाज पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल.या व्हिडीओत टायगर पोर्तुगालमध्ये मॉर्निंग जॉगिंग करताना दिसतोय. मॉर्निंग जॉग्स इन पोर्तुगाल, असे टायगरने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे. व्हिडीओत कधी टायगर पळतोय, कधी भिंतीवरून उडी मारतोय, कधी खुल्या हवेत चित्तथरारक कसरती करतोय. म्हणायला हा व्हिडीओ फक्त ३० सेकंदाचा आहे. पण हा व्हिडीओ ज्याने पाहिला तो थक्क झाला. तूर्तास या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडतोय.

काही दिवसांपूर्वी टायगरचा ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात टायगरच्या अपोझिट अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. पण या व्हिडीओला म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. तूर्तास टायगर ‘बागी 3’ या चित्रपटाची तयारी करतोय. याच तयारीसाठी तो पोर्तुगालमध्ये आहे.

‘बागी 3’ हा ‘बागी’ फे्रन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी आलेल्या दोन्ही पार्टमध्ये टायगर लीड रोलमध्ये होता. तिसºया पार्टमध्येही त्याची वर्णी लागली आहे. ‘बागी 3’मध्येही टायगरचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. याशिवाय हृतिक रोशनसोबतच्या एका चित्रपटातही टायगर दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.

टॅग्स :टायगर श्रॉफ