Join us

"संपूर्ण जग भारतासाठी प्रार्थना करतेय आणि हे.." मालदीववरुन परतलेल्या दिशा आणि टायगरला पाहून भडकले यूजर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 14:31 IST

Tiger Shroff and Disha Patani returned from maldives : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि श्रुती हासन या बॉलिवूड सेलिब्रेटींचा चांगलाच समाचार घेतला.

देश कोरोनाशी लढत असताना बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मालदिवला व्हॅकेशन एन्जॉय करायला गेले होते आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत होते. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि श्रुती हासन या बॉलिवूड सेलिब्रेटींचा चांगलाच समाचार घेतला होता. मालदीवला जाणाऱ्यांच्या यादीत टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीचे नाव देखील सामील होते. हे दोघे काही दिवसांपूर्वी मालदीवला गेले होते. तिथले फोटोदेखील त्यानी पोस्ट केले होते यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. आता दोघेही व्हॅकेशन एन्जॉय करुन परतले आहे. मुंबई एअरपोर्टवरचा दिशा आणि टायगरचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. 

मुंबईत परतले दिशा आणि टायगरदिशा पाटनीने मालदीवला गेल्यावर  तिचा एक बिकिनीमधील फोटो शेअर केला होता. मात्र, यानंतर तिची कोणतीही पोस्ट दिसली नाही. थेट दिशा आणि टायगर मुंबई एअरपोर्टवर दिसले. दिशा गुलाबी रंगाचा टँक टॉप आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये दिसली, तर टायगर निळ्या रंगाच्या वेस्ट आणि व्हाईट ट्राऊजरमध्ये दिसत आहे. दोघांनीही चेहरेवर मास्क लावला होता. सोशल मीडियावर दोघांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यावर अनेकजण कमेंट करतायेत. यूजर्सनी टायगर आणि दिशाला चांगलेच ट्रोल केलं आहे. 

यूजर्सनी केलं ट्रोलएका यूजरने लिहिले, 'मालदीवमध्ये बॅन लागताच तर  घरी आले'. दुसरे म्हणला की, 'जिथे संपूर्ण जग भारतासाठी प्रार्थना करत आहे, तिथे बॉलिवूड सेलिब्रिटी व्हॅकेशनवर, त्यांना लाज वाटली पाहिजे'. 

टॅग्स :दिशा पाटनीटायगर श्रॉफ