टायगर म्हणतो,‘ मी चोर नाही!’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 15:01 IST
अभिनेता टायगर श्रॉफ याचा आगामी चित्रपट ‘मुन्ना मायकेल’ विषयी वाद सुरू आहेत. तो म्हणाला,‘ मी चोर नाही किंवा धोकादायक ...
टायगर म्हणतो,‘ मी चोर नाही!’
अभिनेता टायगर श्रॉफ याचा आगामी चित्रपट ‘मुन्ना मायकेल’ विषयी वाद सुरू आहेत. तो म्हणाला,‘ मी चोर नाही किंवा धोकादायक नाही. त्याला ‘मुन्ना मायकेल’ विषयी सुरू असलेला वादाचे गांभीर्य आहे का? याविषयी चर्चा केली असता तो म्हणाला,‘ हो, मला चित्रपटाविषयी सुरू असलेला वाद माहितीये. पण आपण आता ‘अ फ्लार्इंग जट’ चित्रपटाविषयी बोलूयात.मला फक्त एवढेच म्हणायचेय की, मी चोर नाही किंवा मी धोकादायक नाही.’ टायगर आणि दिग्दर्शक सबिर खान यांचा एकत्र तिसरा चित्रपट ‘मुन्ना मायकेल’ विषयी घोषणा करण्यात आली.नुकतेच क्रितीक कुमार पांडे या लेखक -दिग्दशक याने पोलिस तक्रार केली आहे की, टायगरने त्याची ‘मुन्ना मायकेल’ ची स्क्रिप्ट चोरली आहे. मुन्ना मायकेल म्हणजे डाय-हार्ड मायकेल जॅक्सन फॉलोअर.’