टायगर म्हणतोय,‘खेड्यातील मुलीशी मी करणार लग्न’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 10:27 IST
वाचून गोंधळात पडलात का? हो तुम्ही वाचताय ते अगदी खरं आहे. टायगर श्रॉफ स्वत: असे म्हणतोय की, ‘त्याला म्हणे ...
टायगर म्हणतोय,‘खेड्यातील मुलीशी मी करणार लग्न’
वाचून गोंधळात पडलात का? हो तुम्ही वाचताय ते अगदी खरं आहे. टायगर श्रॉफ स्वत: असे म्हणतोय की, ‘त्याला म्हणे खेड्यातल्या मुलीशी लग्न करायचे आहे. आणि गृहिणी असलेली तरूणीच त्याला पत्नी म्हणून आवडेल.’टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘बाघी’ साठी प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. साबिर खान दिग्दर्शित आणि साजिद नादियाडवाला निर्मित या चित्रपटासाठी दोघांनीही खुप मेहनत घेतली आहे. टायगर पुढे म्हणतो,‘ माझी भूमिका बाघीची आहे. त्या भूमिकेला खुप इगो असतो.या इगोमुळेच तो पुढे खुप संकटांमध्ये सापडतो. पण, त्याला फाईटिंग आवडत असते. त्यावेळी तो एका गुरूजींना भेटतो. तेव्हा ते गुरू त्याला एका कारणासाठी बाघी बनवतात. तो पूर्णपणे शिस्तीत सर्व विद्या शिकून घेतो.’एका मुलाखतीदरम्यान त्याला विचारण्यात आले की तुझी आदर्श पत्नी क शी असेल? तेव्हा तो म्हणाला,‘ मी खेड्यातील मुलीशी लग्न करीन. कारण जेव्हा मी घरी जाईन तेव्हा तिने माझा मसाज करून दिला पाहिजे. तिने घरी राहिले पाहिजे आणि मी घरी जाईन त्यावेळी मला छानपैकी घरचे जेवण बनवून दिले पाहिजे. मला गृहिणी असणाऱ्या मुली आवडतात.’