Join us  

​‘टायगर जिंदा है’मध्ये नसणार ‘हा’ एक सीन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 8:27 AM

या वर्षातला सर्वात मोठा चित्रपट असा दावा ‘टायगर जिंदा है’बद्दल केला जात आहे. तसे पाहता, हा दावा खोटाही नाही. ...

या वर्षातला सर्वात मोठा चित्रपट असा दावा ‘टायगर जिंदा है’बद्दल केला जात आहे. तसे पाहता, हा दावा खोटाही नाही. सलमान खानचे चाहते ‘टायगर जिंदा है’ पाहण्यासाठी आतूर आहेत. सलमान व कॅटरिना कैफ या दोघांची आॅनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासही चाहते उत्सूक आहे. तेव्हा या आतूर चाहत्यांसाठीचं ताजी बातमी आहे. होय, सलमान व कॅटरिनाच्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने पास करत युए सर्टिफिकेट दिले आहे. म्हणजेचं, हा चित्रपट सर्व वयाचे लोक चित्रपटागृहांत जावून बघू शकतील. त्याचमुळे या चित्रपटातील एक सीन्स आणि काही शिव्या गाळण्यात आल्या आहेत. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात तीन कट्स सुचवले होते. एक सीन आणि दोन ठिकाणच्या शिव्यांचा यात समावेश होता.   भारतीय परिचारिकांचा दहशतवादी क्रूर छळ करत असल्याचा एक सीन यात होता. सेन्सॉर बोर्डाच्या आदेशानंतर हा सीन आता चित्रपटात नसेल. दोन ठिकाणच्या शिव्याही इडिट करण्यात आल्या आहेत. १४० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटात प्रेक्षकांना धमाकेदार अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. ‘सुल्तान’ फेम दिग्दर्शक अली अब्बास जफर हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. हा चित्रपट ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘एक था टायगर’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. निश्चितपणे ‘टायगर जिंदा है’ ला आपल्या पहिल्या भागाचा फायदा मिळेल, असे गृहित धरले जात आहे.  नाताळच्या मुहूर्तावर हा चित्रपट सोलो रिलीज असेल. त्यामुळे या सुट्टीचा लाभही ‘टायगर जिंदा है’ला मिळणे अपेक्षित आहे.ALSO READ : ​कॅटरिना कैफ नसती तर ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपटही नसता...!!या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्ससाठी हॉलिवूड अ‍ॅक्शन डायरेक्टरला हायर करण्यात आले होते. त्यामुळे अ‍ॅक्शनपट आवडणा-या पे्रक्षकांसाठी हा चित्रपट नाताळ व नववर्षाची ट्रिट असेल, असे मानले जात आहे.   कॅटरिनाने या चित्रपटात आयएसआय एजंटची भूमिका साकारली आहे. यासाठी कॅटने म्हणे काही रिअल लाईफ एजेंटची भेट घेतली.  या चित्रपटात ती स्पेशल डान्स करताना  दिसणार आहे.