Join us  

सलमान खानच्या 'टाइगर ३'मध्ये झळकणार साऊथचा हा सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 4:13 PM

Tiger 3 : सलमान खानचा चित्रपट 'टायगर ३' दिवाळीच्या मुहूर्तावर १० नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

बॉलिवूड आणि साऊथ सिनेइंडस्ट्रीतून एक दमदार बातमी समोर आली आहे. आता साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचे नाव सलमान खान(Salman Khan)च्या बहुप्रतिक्षीत आणि यशराज बॅनरच्या स्पाय युनिव्हर्स चित्रपट 'टायगर ३'(Tiger 3)शी जोडले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशराज बॅनरचे मालक आदित्य चोप्रा बॉलिवूडच्या 'दबंग खान' म्हणजेच सलमान खानच्या 'टायगर ३' या चित्रपटातून ज्युनियर एनटीआरला बॉलिवूडमध्ये आणणार आहेत. ज्युनियर एनटीआर आता यशराज कॅम्पच्या 'टायगर ३' चित्रपटात दिसणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच आदित्य चोप्रा आणि ज्युनियर एनटीआर यांच्यात चर्चा झाली. दोन दिग्गजांमधील हा संवाद २ ऑक्टोबर रोजी झाला. २ ऑक्टोबरला यशराज बॅनरच्या 'वॉर' या चित्रपटाला ४ वर्षे पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने त्यांच्यात 'वॉर २' संदर्भात चर्चा झाली. ज्युनियर एनटीआर बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशनच्या आगामी 'वॉर २' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

त्याचबरोबर सलमान खानचा टायगर ३ हा चित्रपट 'वॉर २' पूर्वी रिलीज होणार आहे. टायगर ३ दिवाळीच्या मुहूर्तावर १० नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर टायगर ३ या चित्रपटात सलमान खान 'वॉर २' मधील खलनायक ज्युनियर एनटीआरची ओळख करून देणार आहे. टायगर ३ बद्दल बोलायचे झाले तर सलमान खानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात इमरान नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.

टॅग्स :सलमान खानवाघ