Join us

'हे' आहेत बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश कपल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 19:35 IST

नुकतेच शाहिद आणि मीराला एका अॅवॉर्ड सोहळ्यात  ‘स्टायलिश कपल’ या अॅवॉर्डने गौरविण्यात आले. शाहिद आणि मीरा प्रमाणे बॉलिवूडमध्ये अनेक ...

नुकतेच शाहिद आणि मीराला एका अॅवॉर्ड सोहळ्यात  ‘स्टायलिश कपल’ या अॅवॉर्डने गौरविण्यात आले. शाहिद आणि मीरा प्रमाणे बॉलिवूडमध्ये अनेक स्टायलिश कपल्स आहे घेऊया त्यांच्या स्टायलचा आढावा. शाहिद आणि मीरा शाहिद आणि मीराची राजपूतचे कपल हे अनेकांचे आवडती जोडी आहे. सगळ्या पार्टीच्या ठिकाणी शाहिद मीरासोबतच हजेरी लावतो. रेड कार्पेटवर  तर शाहिद आणि मीरा आपल्या स्टायलिश अंदाजात हजेरी लावत अनेकांच्या नजरा खिळवून ठेवतात.सैफ अली खान- करिना कपूर नवाब पतौडी खान आणि त्यांची बेगम अर्थात करिना कपूर आपल्या रॉयल अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असतात.  सैफ आणि करिना नेहमीच्या आपल्या स्टायलबाबत नेहमीच जागरुक दिसतात. पार्टी आणि सार्वजनिक ठिकाणी ते आपल्या खास नवाबी अंदाजात हजेरी लावतात. बॉलिवूडमधले सैफ आणि करिना हे सगळ्यात हॉट कपल आहे.  शाहरुख खान -गौरी बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरीला सगळ्यात स्टायलिश आणि वेल ड्रेस्ट कपल समजले जाते. शाहरुख आणि गौरी नेहमीच त्यांच्या  बोल्ड अ‍ॅण्ड डॅशिंग अंदाजात बघावयला मिळतात.