Join us  

शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये झालं होतं कडाक्याचं भांडण?, खुद्द किंग खाननं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 5:44 PM

Shahrukh Khan And Salman Khan : एक काळ असा होता की शाहरुख खान आणि सलमान खानच्या भांडणाच्या बातम्या सर्व मीडियात पसरल्या होत्या. आता या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शाहरुख खान सलमान खानसोबतच्या भांडणाचे कारण सांगत आहेत.

शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) हे केवळ बॉलिवूडचे सुपरस्टारच नाहीत तर चांगले मित्रही आहेत. दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. अलीकडेच शाहरुख खान आणि सलमान खान यांची जोडी पठाण चित्रपटात पाहायला मिळाली. त्यांना पाहून चाहते खूप उत्सुक झाले होते. पण एक काळ असा होता की शाहरुख खान आणि सलमान खानच्या भांडणाच्या बातम्या सर्व मीडियात पसरल्या होत्या. आता या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये शाहरुख खान सलमान खानसोबतच्या भांडणाचे कारण सांगत आहेत.

शाहरुख खान आणि सलमान खानचा हा थ्रोबॅक व्हिडीओ एका शोमधील आहे. या व्हिडीओमध्ये किंग खान गंमतीने सांगतो की, 'सर्वात मोठं रहस्य म्हणजे माझ्या आणि सलमान खानमध्ये भांडण झालं होतं. पण आमच्यात का भांडण झाले हे कोणालाच माहीत नाही. आम्हा दोघांमध्ये सर्वात आनंदी कोण यावरून आमच्यात भांडण व्हायचे आणि यावरून आमच्यात भांडण झाले होते, आज आम्ही तुम्हाला याचे खरे कारण सांगत आहोत.

व्हिडिओमध्ये शाहरुख खान पुढे म्हणाला, 'मी सलमान खानला सांगितले की, जेव्हा मी घरी जातो तेव्हा मला पत्नी भेटते आणि जेव्हा मला ती भेटते तेव्हा मला आनंद होतो. तर सलमान खान म्हणाला आहे की, जेव्हा मी घरी जातो तेव्हा माझी पत्नी नसेल तर मला जास्त आनंद होतो. मी म्हणालो की मी घरी गेल्यावर माझी लाडकी माझ्या मांडीवर बसते, त्यामुळे मला आनंद होतो. सलमानने मला सांगितले की, जेव्हा मी घरी जातो तेव्हा अनेक लाडक्या माझ्या मांडीवर बसतात, त्यामुळे मला अधिक आनंद होतो. त्यामुळे या मुद्द्यावरून आमच्यात वाद झाला. शाहरुख खान आणि सलमान खानचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टॅग्स :शाहरुख खानसलमान खान