Join us

एका भांडणातून अभिनेत्याच्या वडिलांनी पत्नी आणि मुलीची केलेली हत्या, त्यालाही लागली होती गोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 12:01 PM

बॉलिवूड अभिनेत्याने अनेक वर्षांनी मन हेलावून टाकणाऱ्या कौटुंबिक घटनेबद्दल सांगितले. त्याने सांगितले की त्याच्या वडिलांनी त्याच्या वाढदिवशी त्याच्या आई आणि बहिणीला कशा गोळ्या मारल्या.

बेखुदी, बाली उमर को सलाम आणि अंगारा यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता कमल सदाना(Kamal Sadanah)ची एकेकाळी खूप मोठी फॅन फॉलोव्हिंग होती. शेवटचा तो २०२३ मध्ये 'पिप्पा' या चित्रपटाद्वारे प्रसिद्धीझोतात आला होता. दरम्यान, त्याच्या कुटुंबासोबत झालेल्या अपघाताने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. अभिनेत्याने अनेक वर्षांनंतर खुलासा केला की त्याचे वडील ब्रिज सदना यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्याची बहीण नम्रता आणि आई सईदा खान यांची हत्या केली होती. सिद्धार्थ कन्ननला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, या घटनेदरम्यान त्यालाही गोळी लागली होती.

शोमध्ये अभिनेता म्हणाला, “हे खूप वेदनादायक आहे. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या कुटुंबाचा मृत्यू होताना पाहणे. मलाही गोळ्या घातल्या गेल्या. माझ्या मानेच्या एका बाजूने एक गोळी लागली आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. मी वाचलो. दुसरे कोणतेही कारण नाही. माझ्या जिवंत असण्यामागे कोणतेही तार्किक कारण नाही. जणू काही गोळी प्रत्येक मज्जातंतूला चकवा देत पलीकडे बाहेर आली आहे. मी कोणत्याही समस्येशिवाय जगलो. कोणतीही शारीरिक समस्या नाही. ”

अभिनेत्यालाही लागली होती गोळी

कमल सदानाने गोळी लागल्यावर रक्ताने माखलेल्या आई आणि बहिणीला कसे रुग्णालयात नेले होते हे देखील सांगितले. या घटनेची आठवण करून देताना ते म्हणाले की, माझ्या आई आणि बहिणीला रक्तस्त्राव होत असताना मला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले आणि त्यावेळी मलाही गोळी लागली हे मला माहीत नव्हते. खरं तर डॉक्टर म्हणाले, 'तुझ्या शर्टावर इतके रक्त का आहे?' मी म्हणालो, 'नाही, ती माझ्या आईची किंवा बहिणीची असेल.' ते म्हणाले, 'नाही, तुला गोळी लागली आहे.' आमच्याकडे इथे पुरेशी जागा नाही. तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. मी म्हणालो, 'नाही, तुम्ही फक्त माझ्या आई आणि बहिणीला वाचवा आणि मी माझ्या वडिलांकडूनही जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो की ते त्यावेळी काय करत असतील.'" मग, अभिनेत्याने त्याचा मित्र ॲबिसने त्याला कसे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले, याबद्दल सांगितले. 

वाढदिवसादिवशी घडली ही घटना

२१ ऑक्टोबर रोजी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी हे सर्व कसे घडले याबद्दल बोलताना कमल सदाना म्हणाला की, “मला एक शस्त्रक्रिया करावी लागली, जी मुळात जखम साफ करण्यासाठी होती. त्या दिवशी माझा वाढदिवस होता. त्यांनी मला भूल दिली आणि अर्थातच जखम साफ केली. डोळे उघडल्यावर. मला घरी नेण्यात आले आणि माझे संपूर्ण कुटुंब माझ्या डोळ्यांसमोर मृतावस्थेत पडले होते.'' अभिनेत्याने पुष्टी केली की त्याच्या वडिलांनी दारूच्या नशेत आई आणि बहिणीची हत्या केली.

नाहीतर तुम्ही तिथेच थांबाल....

कमल सदानाला तो वाढदिवस साजरा करतो का असे विचारले असता तो म्हणाला, अनेक वर्षांपासून तो वाढदिवस साजरा करू शकला नाही पण काही वर्षांपूर्वी त्याने पार्टी केली. जरी त्याला त्याचा वाढदिवस साजरा करायला आवडत नसला तरी, त्याचे मित्र दरवर्षी त्याला आनंद देण्यासाठी घरी येतात. इतकंच नाही तर त्या अपघातानंतरही तो त्याच घरात राहत असल्याचंही अभिनेत्याने सांगितलं. यावर कमल सदना म्हणाले की, मी एकटा माणूस नाही ज्याने ही शोकांतिका पाहिली आहे. जगात असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या प्रकारच्या शोकांतिकेतून गेले आहेत. पण पुढे जायचे आहे. तुम्ही तुमच्या हृदयात द्वेषाने जीवन जगू शकत नाही. नाहीतर तुम्ही तिथेच थांबाल.