Join us  

लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी तनिषा मुखर्जीची अशीही धडपड, सोशल मीडियावर सतत अपडेट करते अशा गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 4:34 PM

तनिषा ग्लॅमर दुनियेपासून लांब असून फक्त फोटोशूट करताना दिसते. 

तनिषा मुखर्जी सध्या काय करते असे अनेक प्रश्न हे फोटो पाहून नेटीझन्सना सतावत आहेत. कारण बिग बॉसनंतर कोणत्याही सिनेमात तनिषा झळकली नाही. ना कोणत्या शोमध्ये ती झळकली. त्यामुळे नेमकं तनिषाचे काय सुरु आहे असा प्रश्न हे फोटो पाहिल्यानंतर निर्माण होणे साहजिकच आहे.

 

मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरच मिळतील. कारण ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट शेअर करत असते. तनिषा ग्लॅमर दुनियेपासून लांब असून फक्त फोटोशूट करताना दिसते. 

होय, नुकतेच तिने तिचे फोटोशूट केले आहे. फोटोशूट दरम्यान तिच्या खूप बोल्ड आणि हॉट अदा कॅमे-यात कॅप्चर झाल्या आहेत. वेगवेगळ्या गोष्टी करत तिला लाइमलाइटमध्ये राहायला खूप आवडते. खरंतर मुखर्जी कुटुंबाशी निगडीत असूनही अॅक्टींग करिअरमध्ये अभिनेत्री म्हणून सिद्ध करण्यात ती अयशस्वी ठरली.

 

त्यानंतर तिने आपला मोर्चा टीव्ही शोकडे वळवला मात्र तिथेही तिचे नशीब फारसे पालटले नाही. त्यामुळे तिने अॅक्टीग क्षेत्रातून ब्रेक घेतला. विशेष म्हणजे तनिषाने वयाची  40 ओलांडली आहे. त्यामुळे तिची करिअरची गाडी आता बॉलिवूडच्या रूळावर धावणे अशक्यच. 

तुर्तास वेगवगळे फोटोशूट करत नेटीझन्सचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असली तरीही तनिषाची जादू फिकीच असल्याचे जाणवते. त्यामुळे हे अशा प्रकारचे फोटो पाहून पब्लिसिटीसाठी काही पण अशीच त-हा सध्या तनिषाची झालेली दिसते.