Join us  

छोट्या पाहुण्यासोबत खेळताना दिसला तैमूर, तर ब्लू ड्रेसमध्ये करीना कपूरने फ्लॉन्ट केला बेबी बंप

By तेजल गावडे | Published: November 12, 2020 10:38 AM

अभिनेत्री करीना कपूर लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. पुढील वर्षाच्या सुरूवातीला त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. तैमूरदेखील आपल्या भाऊ किंवा बहिणीची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतेच सोशल मीडियावर तैमूरचा छोट्या पाहुण्यासोबत खेळतानाचा फोटो समोर आला आहे. तैमूरच्या मांडीवर बेबी गर्ल पहायला मिळत आहे. तर तैमूर खूप मोठी स्माइल देताना दिसतो आहे.

करीना कपूर खानने नुकतेच तिची पर्सनल असिस्टंट आणि मैत्रीण पोनम दमानियाला घरी निमंत्रण दिले होते. छोटेसे दिवाळी सेलिब्रेश केले. नैना सिंगने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने हे फोटो पोस्ट करत लिहिले की, बेबो आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल आभारी आहे. सियाने आपला पहिला फ्रेंड बनवला. तुम्हाला दोघांना प्रेम. यासोबत नैना सिंगने पूनम दमानियालाही टॅग केले.

इतर फोटोंमध्ये करीना कपूर खान निळ्या ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसणार आहे. यापूर्वी कित्येकदा ती मुंबईत बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते. नुकतेच करीनाचे कित्येक लूक्स तिच्या चॅट शोच्या शूटिंगदरम्यान पहायला मिळाल्या.

करीना कपूरने नुकतेच लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आमीर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे.

टॅग्स :तैमुरकरिना कपूरदिवाळी 2022