Join us  

वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसला तैमुर, वडील सैफने शिकवलीय त्याला ही खास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 4:17 PM

लवकरच दुस-यांदा बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे तैमुरनंतर आता पुन्हा बाळाच्या आगमनाची वाट सैफीना पाहात आहेत. सध्या करिना आपली प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे.

स्टार किड्समध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा आणि ज्याच्याविषयी प्रत्येकालाच जाणून घ्यायचं तो म्हणजे तैमूर. बॉलीवुडचा छोटे नवाब आणि बेगम करीना यांची जान म्हणजे त्यांचा लेक तैमूर. त्याच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तैमूरच्या बाललीला सध्या प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतोय.

सैफ, करीना आणि तैमूर केक कटिंग करत सेलिब्रेशन करताना व्हिडीओत पहाायला मिळत आहे. सैफच्या जवळच्या मित्राचा वाढदिवस होता. त्यामुळे सैफ खास मित्रासाठी हे छोटेसे सेलिब्रेशन केले. समोर केक दिसताच  तैमूर पूर्ण उत्साहात बर्थडे साँग गाताना दिसला. सैफ आणि करीना त्यांच्या या खास मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्या मात्र या संपूर्ण व्हिडीओमध्ये पुन्हा तैमुरच्या बाललीला पाहून चाहतेही त्याचे कौतुकच करताना पाहायला मिळत आहे. 

तैमूरच्या जन्माआधी २०१६मध्ये बेबो करीना 'उडता पंजाब' या सिनेमात झळकली होती. त्यानंतर तिनं बॉलीवुड सिनेमांपासून ब्रेक घेतला. या ब्रेकमध्ये बेबोनं आपला सगळा वेळ लाडका लेक तैमूरसाठी दिला. तैमूरची देखभाल आणि त्याची काळजी घेण्याला सुपरमॉम बेबोनं प्राधान्य दिलं.

मुलांना तुमच्या आयुष्यात स्थान देणं गरजेचं असतं. त्यांना तुमच्या जीवनात सामावून घ्या. तैमूर माझ्यात आणि सैफमध्ये गुंतला आहे. आम्ही कुठेही जात असलो तरी तो आमच्यासोबत असतो. मी किंवा सैफ शूटिंगला जात असलो तरी तो सोबत असतो. सात महिन्यांचा असल्यापासून तो आमच्यासोबत प्रवास करतो. आमच्या जीवनशैलीसह त्यानं जुळवून घेणं गरजेचं आहे असे करिनाने दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

लवकरच दुस-यांदा बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे तैमुरनंतर आता पुन्हा बाळाच्या आगमनाची वाट सैफीना पाहात आहेत. सध्या करिना आपली प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. प्रेग्नंसीमध्येही ती आराम न करता आपले काम सुरू ठेवले आहे. इतके असूनही करिना तिच्या प्रेग्नंसीमध्ये स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष होवू देत नाहीय. दिवसेंदिवस तिच्या चेह-यांवर प्रेग्नंसीचा ग्लो दिसू लागलाय. 

टॅग्स :करिना कपूरतैमुर