Join us

आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 17:18 IST

आपण सगळेच bisexual असल्याचं स्वराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. याबरोबरच अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव आवडत असल्याचंही स्वराने म्हटलं आहे.

वीरे दी वेडिंग, प्रेम रतन धन पायो, तनु वेड्स मनू यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलेली बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या मोठ्या पडद्यापासून लांब आहे. स्वरा कायमच तिच्या बेधडक स्वभाव आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने भलतंच वक्तव्य केलं आहे. आपण सगळेच bisexual असल्याचं स्वराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. याबरोबरच अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव आवडत असल्याचंही स्वराने म्हटलं आहे. मुलाखतीतील तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

स्वरा भास्करने नुकतीच इंडियन एक्सप्रेसच्या स्क्रीन या शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत बोलताना स्वरा म्हणाली, "जर तुम्ही लोकांना हवं तसं वागण्याचं स्वातंत्र्य दिलं तर तुम्हाला कळेल की आपण खरंच bisexual(उभयलिंगी) आहोत. पण हजारो वर्षांपासून आपल्याला heterosexuality (विषमलैंगिकता) ची विचारसरणी शिकवली गेली आहे. कारण मानव प्रजातीची वाढ होण्यासाछी ती आदर्श मानली गेली आहे". त्यानंतर स्वराने तिच्या महिला क्रशबद्दलही सांगितलं. "मला डिंपल यादव आवडतात", असं तिने सांगितलं. 

स्वराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या बोल्ड वक्तव्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. दरम्यान, सध्या स्वरा भास्कर तिचा पती फहाद अहमदसह पती पत्नी और पंगा या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. 

टॅग्स :स्वरा भास्करसेलिब्रिटी