Join us  

सुश्मिता सेनचा भाऊ राजीव व अभिनेत्री चारू असोपाचा बिकनीतील लीपलॉक फोटो व्हायरल, पहा त्यांचा रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 5:30 PM

अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन व टीव्ही अभिनेत्री चारू असोपा नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. आता ते थायलंडमध्ये हनीमून एन्जॉय करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन व टीव्ही अभिनेत्री चारू असोपा नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. आता ते थायलंडमध्ये हनीमून एन्जॉय करत आहेत. चारू आणि राजीव त्यांच्या हनीमूनचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोत ते लिपलॉक करताना दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हनीमूनच्या या फोटोत चारू आणि राजीव पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. पूलमध्ये राजीव व चारू रोमँटिक पद्धतीनं एकमेकांसोबत लिप लॉक करताना दिसत आहेत. राजीवने हा फोटो शेअर करून कॅप्शन दिलं की, लव पॅशनेटली. या फोटोत चारू पूलमध्ये बिकनीमध्ये बोल्ड अंदाजात दिसतेय. 

राजीव व चारू यांचे १६ जून रोजी गोव्यात काही जवळचे नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न पार पडले. राजस्थानी व बंगाली पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटोदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

सुश्मिता सेनच्या कुटुंबानं नववधू चारूचा बंगाली पद्धतीनं गृह प्रवेश केला होता. सुश्मिताच्या आईनं तिची आरती केली आणि प्रेमानं आपल्या सुनेचा गृहप्रवेश केला होता.

चारू व राजीवने गोव्यात लग्न करण्याआधीच गुप्तपणे लग्न करून सगळ्यांना चकीत केले होते. त्यानंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

आता हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

टॅग्स :सुश्मिता सेन