Join us  

बीएफ रोहमनसोबत पुन्हा एकदा रोमाँटिक झाली सुश्मिता, पाहा त्यांचा रोमान्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 6:00 AM

बी-टाऊनमध्ये सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. हे कपल सोशल मीडियावर नेहमीच फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते.

ठळक मुद्देसुश्मिताने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहेसुष्मिताने या व्हिडीओला कॅप्शन देखील दिले आहे

बी-टाऊनमध्ये सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. हे कपल सोशल मीडियावर नेहमीच फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. सुश्मिताने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्यासोबत रोहमनसुद्धा दिसतोय. दोघे व्हिडीओत एक्ससाईज करताना दिसतायेत. सुष्मिताने या व्हिडीओला कॅप्शन देखील दिले आहे.

काही दिवसांपासून सुश्मिता आणि रोहमन यांनी साखरपुडा केला असल्याचे म्हटले जात आहे. सुश्मिताने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टवरून त्या दोघांचा साखरपुडा झाला असल्याचा तर्क लावण्यात आला होता. सुश्मिताने शेअर केलेल्या या फोटोत तिच्या हातात एक अंगठी दिसून येत आहे. यावरूनच सुश्मिताने आणि रोहमनने साखरपुडा केला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 

स्पॉटबॉयने काही दिवसांपूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, रोहमन आता सुश्मिताच्या घरी शिफ्ट झाला आहे. त्यांना त्यांच्या बातमीत म्हटले आहे की, रोहमन रोज सुश्मिताच्या वांद्रे येथील घरी येत होता. सुश्मिताच्या दोन्ही मुलींसोबत त्याची चांगलीच गट्टी जमली आहे. त्यामुळे आता त्या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. रोहमनच्या आधी सुश्मिता रितिक भसिनला डेट करत होती. मात्र दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर एका फॅशन इव्हेंटमध्ये सुश्मिता आणि रोहमनची भेट झाली.

टॅग्स :सुश्मिता सेन