Join us  

'छिछोरे'ला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर  सुशांतच्या वडिलांनी दिली प्रतिक्रीया म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 12:28 PM

Sushant's this movie had positive message on fighting over failure & when people learnt about Sushant's suicide everyone was shocked. 'छिछोरे’ सिनेमातून सकारात्मक संदेश देण्यात आला होता. अशा प्रकारच्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याने स्वत: आत्महत्या करणे हे साऱ्यांसाठी मोठा धक्काच होता. 

यंदाच्या 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिवंगत अभिनेता  सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर यांचा 'छिछोरे' या  सिनेमाला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा म्हणून पुरस्कार मिळाला आहे.त्याचा हा सिनेमा अत्यंत लोकप्रिय ठरला होता. त्याच्या भूमिकेचं विषेश कौतुकंही करण्यात आलं होतं.

'छिछोरे’ सिनेमातून सकारात्मक संदेश देण्यात आला होता. अशा प्रकारच्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याने स्वत: आत्महत्या करणे हे साऱ्यांसाठी मोठा धक्काच होता. 

सुशांत सिंह राजपूतने गेल्या वर्षी 14 जून रोजी  आत्महत्या करत कायमचा  जगाचा निरोप घेतला.सुशांत सारख्या प्रचंड प्रतिभाशाली  कलाकाराला आत्महत्या करावीशी वाटणं हेच मोठ दुःख होत.

 मुळात त्याच्या सिनेमांना प्रोत्साहन न मिळणे हे देखील त्याच्या आत्महत्या करण्यामागे कारण असल्याचे बोलले गेले. आजही त्याच्या मृत्यूचा गुंता सुटलेला नाहीय.

अभिनेता सुशांत सिंह त्याचे हे यश पाहण्यासाठी जिवंत नाही. सुशांतचे वडील केके सिंह यावर प्रतिक्रिया देताना भावूक झाले होते. राष्ट्रीय पुरस्कार तर मिळाला.  मात्र आज तो या जगात नाहीय. हे यश पाहण्यासाठी तो आज जिवंत हवा होता. सुशांत राहत असलेल्या पाटणामध्ये त्याच्या कॉलनीत राहणाऱ्या सुशांतच्या चाहत्यांनी आनंद साजरा केल्याचेही पाहायला मिळाले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत