Join us  

सुशांत सिंग राजपूतचा मित्र मुकेशने शेअर केला इमोशनल व्हिडीओ; पाहून तुम्हालाही अश्रू रोखता येणार नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 5:22 PM

सुशांत सिंग राजपूत हा एक अभिनेता असण्यासोबतच एक माणूस म्हणून खुप चांगला होता. त्याने अनेक मित्रांना आपल्या पे्रमळ स्वभावाने आपलेसे केले होते. त्यातलाच एक जिवलग मित्र म्हणजे दिग्दर्शक मुकेश छाबडा. त्याने सुशांतच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीवर आधारित एक व्हिडीओ बनवला आहे.

सुशांत सिंग राजपूतची एक्झिट ही सर्वांच्याच मनाला चटका लावणारी होती. त्याच्या निधनाच्या २ आठवडयानंतरही त्याचे आप्तस्वकीय, मित्र, चाहते या दु:खातून स्वत:ला सावरू शकलेले नाहीत. त्याचा अत्यंत जवळचा मित्र असलेला मुकेश छाबडा आणि त्याच्या टीमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात सुशांतची ‘काय पोचे’ ते ‘दिल बेचारा’ पर्यंतच्या प्रवासातील काही क्षणचित्रे आहेत. पडद्यामागचा सुशांत कसा होता हे यात चाहत्यांना बघायला मिळेल. तसेच आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे तो कधीही ऑडिशनमध्ये हारला नाही. मुकेशने बनवलेला हा व्हिडीओ बघून तुम्हालाही अश्रू रोखता येणार नाहीत...

सुशांत सिंग राजपूत हा एक अभिनेता असण्यासोबतच एक माणूस म्हणून खुप चांगला होता. त्याने अनेक मित्रांना आपल्या पे्रमळ स्वभावाने आपलेसे केले होते. त्यातलाच एक जिवलग मित्र म्हणजे दिग्दर्शक मुकेश छाबडा. त्याने सुशांतच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीवर आधारित एक व्हिडीओ बनवला आहे. ज्यात त्याचा पदार्पणापासूनचा संपूर्ण प्रवास चित्रीत करण्यात आला आहे. १९८६ ते २०२० पर्यंतची त्याची अभिनयाची कारकिर्द यात फोटोंच्या माध्यमातून बनवली आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत त्याने म्हटले आहे, ‘वो लडका जो किसी ऑडिशन  मैं फेल नही हूँआ...’ हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्या महान कलाकाराच्या कारकिर्दीला नक्कीच सलाम कराल.

सुशांतच्या निधनानंतर दुसऱ्या  दिवशी मुकेशने त्याला एक पोस्टसह श्रद्धांजली दिली होती. तो म्हणाला,‘सुशांत हा मला माझ्या भावासारखा होता. ही गोष्ट माझ्यासाठी खुप जास्त क्लेशदायक आहे. माझ्याकडे शब्दच नाहीत. इंडस्ट्रीने एक उत्कृष्ट हिरो गमावला आहे. आपली कधीही न संपणारी बडबड आता एकदमच थांबली. मित्रा, तू जिथे असशील तिथे सुखी असशील अशी आशा करतो.’

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतबॉलिवूड