Join us  

​‘या’ रिमेकमध्ये सुशांत सिंग राजपूत बनणार ‘कॅन्सर सरवाइवर’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 10:06 AM

बॉलिवूड मेकर्सचा मोर्चा आता रिमेकडे वळताना दिसतोय. होय, म्हणूनच गेल्या काही दिवसांत रिमेक गाणी आणि रिमेक चित्रपटांची संख्या वाढतेय. ...

बॉलिवूड मेकर्सचा मोर्चा आता रिमेकडे वळताना दिसतोय. होय, म्हणूनच गेल्या काही दिवसांत रिमेक गाणी आणि रिमेक चित्रपटांची संख्या वाढतेय. आता या यादीत आणखी एका रिमेकचे नाव सामील होणार आहे. होय, ‘द फॉल्ट इल अवर स्टार्स’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आपण येत्या दिवसांत पाहू शकणार आहोत आणि विशेष म्हणजे, या रिमेकमध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची वर्णी लागली आहे.हॉलिवूड फिल्ममेकर जोश बून यांनी २०१४ मध्ये आलेल्या  ‘द फॉल्ट इल अवर स्टार्स’ या रोमॅन्टिक ड्रामाचे दिग्दर्शन केले होते. याच्या हिंदी रिमेकच्या दिग्दर्शनाची जबाबदारी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा सांभाळणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या लीड अ‍ॅक्ट्रेसचे नाव फायनल झालेले नाही. पण सुशांतचे नाव मात्र फायनल आहे. पुढील वर्षापासून या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे.  मुकेश छाबडा यांनी सुशांतला ‘काय पो चे’मधून लॉन्च केले होते. पण आता ‘द फॉल्ट इल अवर स्टार्स’च्या हिंदी रिमेकमधून मुकेश छाबडा स्वत: दिग्दर्शनात डेब्यू करणार आहेत.‘द फॉल्ट इल अवर स्टार्स’ हा चित्रपट एका कॅन्सरपीडित मुलीची कथा आहे. हेजल नावाची ही कॅन्सरपीडित मुलगी सपोर्ट ग्रूपमधील एका मुलाला भेटते आणि त्याच्या प्रेमात पडते. सुशांत या चित्रपटात एनसेल एलगोर्टने साकारलेली ‘गस’ची व्यक्तिरेखा जिवंत करेल. ‘द फॉल्ट इल अवर स्टार्स’मध्ये हेजलची भूमिका शॅलेन वुडलेने साकारली होती.  सध्या सुशांत सिंग राजपूत ‘केदारनाथ’ या चित्रपटात बिझी आहे. यात तो सारा अली खानसोबत दिसणार आहे. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.  यानंतर तो ‘चंदा मामा दूर के’मध्ये दिसणार आहे. सुशांत सिंगने नुकतेच नासाला जाऊन त्याचा आगामी चित्रपट  ‘चंदा मामा दूर के’साठी ट्रेनिंग घेतले आहे. नासाला जाऊन ट्रेनिंग घेणारा तो पहिलाच भारतीय अभिनेता ठरला आहे.