Join us  

सुशांतच्या आत्म्याशी बोलणा-या एक्स्पर्टला स्वत:लाही विश्वास बसेना...! सहा दिवसांत वाढले इतके फॉलोअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 3:30 PM

सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा करणा-या स्टीव्ह हफच्या व्हिडीओनंतर देशभरात खळबळ उडाली. स्टिव्हने आत्तापर्यंत तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. या तिन्ही व्हिडीओत सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा स्टिव्हने केला आहे.

सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा करणा-या स्टीव्ह हफच्या व्हिडीओनंतर देशभरात खळबळ उडाली. स्टिव्हने आत्तापर्यंत तीन व्हिडीओ शेअर केले आहेत. या तिन्ही व्हिडीओत सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा स्टिव्हने केला आहे. या व्हिडीओत त्याने सुशांतच्या मृत्यूबद्दलचे अनेक दावे केलेत ते ऐकून सगळेच हैराण झालेत. स्टिव्हचे हे दावे किती खरे किती खोटे हे तर माहित नाही. पण हो, या व्हिडीओमुळे स्टिव्हच्या फॉलोअर्समध्ये मात्र लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळतेय.

विश्वास बसणार नाही पण गेल्या सहा दिवसांत स्टिव्ह हफने 4 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स बनवले आहेत. खुद्द स्टिव्हने याची माहिती दिली आहे. ‘गेल्या सहा दिवसांत माझ्या युट्यूब चॅनलला 4 लाखांहून अधिक नवे फॉलोअर्स मिळालेत. आता माझे 1.5 मिलियनपेक्षा अधिक सब्सक्राइबर्स आहेत. मला स्वत:ला यावर विश्वास बसत नाहीये. पण यासाठी मी सर्वांचे आभार मानेल,’ असे स्टिव्हने म्हटले आहे.सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा केल्यानंतर स्टिव्हच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली, हे स्पष्ट आहे.

काय केलेत स्टिव्हने दावेनुकताच स्टीव्हने फेसबुक वर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, जेव्हा मी सुशांतच्या आत्म्याशी बोलत होतो तेव्हा त्याचा आवाज खूप स्ट्रॉंग होता. स्टीव्हने पोस्टमध्ये लिहिले की हजारो रिक्वेस्ट नंतर मी सुशांतच्या आत्म्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी सुद्धा हे एक अविश्वसनीय सेशन होते. या सेशनमध्ये त्याने त्याच्या आवाजात स्पष्ट आणि सरळ उत्तरे दिली. मला सुशांत साठी अजून एक असेच सेशन करायचे आहे ज्यात मी सुशांतला अजून काही अवघड प्रश्न विचारेन.

स्टीव्हने हे सेशन १३ जुलैला केले होते. स्टीव्हने हा व्हिडिओ यूट्यूब वर सुद्धा शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये स्टीव्ह सुशांतच्या आत्म्याला विचारतो की तुला आठवते का तुझा मृत्यू कसा झाला? स्टीव्हने असे विचारतात समोरील यंत्रा मधून इंग्रजी भाषेत आवाज येतो की, इथे खूप प्रकाश आहे हफ, त्यांना सांग की मला आता प्रकाश मिळाला आहे. आता हा प्रकाश खूप मंद होत चालला आहे. ते तुला बघत आहेत. मला खरंच देवाला भेटायचे होते.

स्टीव्हने जेव्हा सुशांतच्या आत्म्याला विचारले की तू जीव का दिलास तेव्हा त्या यंत्र मधून आवाज आला की मला बदल हवा होता. स्टीव्हचे म्हणणे आहे की जेव्हा सुशांत त्याच्याशी बोलत होता त्यावेळी तो एकटा नसून तेथे त्याच्यासोबत अन्य दोन आत्मे सुद्धा होते ज्यात एक पुरुष होता तर एक स्त्री होती.तो गेली दहा वर्षे आत्मांशीबोलतअसल्याचादावास्टिव्हनेकेलाआहे.सोबत बोलतो. यासाठी त्याने एक खास मशीन तयार केली आहे. या यंत्रा मधून आत्म्यांचा आवाज ऐकू येतो. स्टीव्ह याआधी मायकल जॅक्सन, पैट्रीक स्वेज यांच्या आत्म्याशी सुद्धा बोलला आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत