Join us  

Sushant Singh Rajput Case : रिया विरोधात ईडीच्या हाती नाही लागले धागेदोरे, अकाउंटमध्ये नाही सापडली मोठी रक्कम

By तेजल गावडे | Published: October 10, 2020 1:08 PM

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलने तपास करत असलेल्या ईडीला तपासात काहीच हाती लागले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या अकाउंटमधून कोणताच मोठा संशयास्पद व्यवहार समोर आला नाही.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय व्यतिरिक्त ईडी आणि एनसीबीदेखील करत आहे. खरेतर सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी पटनामध्ये दाखल केलेल्या तक्रारीत रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरोधात आरोप केले होते की तिने सुशांतच्या अकाउंटमधून १५ कोटी रुपये बळकावल्याचा आरोप केला होता. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईडीच्या तपासात रियाच्या विरोधात काहीच संशयास्पद समोर आले नाही.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, सुशांत प्रकरणात तपास करत असलेल्या ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात कोणतेच संशयास्पद ट्रांजॅक्शन समोर आले नाही. ईडीचे हेदेखील म्हणणे आहे की, सुशांतच्या कुटुंबाला त्याची जमा रक्कम आणि संपत्तीबद्दल काहीच विशेष माहिती नव्हती. ईडी मागील दोन महिन्यांपासून सुशांतचे बँक अकाउंट्स आणि त्याची फायनॅन्शल अक्टिव्हिटीचा तपास करत आहे. 

सुशांत प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलने तपास केल्यानंतर ईडीला कोणतेच असे व्यवहार समोर आले नाहीत. मात्र अद्याप ईडीची टीम सुशांतच्या अकाउंटमधून झालेल्या काही छोट्या व्यवहारांचा तपास करत आहे.

सिद्ध झाले नाहीत सुशांतच्या वडिलांनी केलेले आरोप२५ जुलैला सुशांतच्या वडिलांनी पटनामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाविरोधात फसवणूक आणि पैसे उकळल्याचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलने या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात केली होती. सुशांतचे वडील केके सिंग यांनी आरोप केले होते की रिया आणि इतर लोकांनी त्यांच्या मुलाच्या पैशांचा वापर त्यांच्या फायद्यासाठी केला होता. या तक्रारीत केके सिंग यांनी आरोप केले होते की सुशांतच्या एका अकाउंटमध्ये १७ कोटी रुपये होते. ज्यात एक वर्षांच्या आत १५ कोटी रुपये ट्रान्सफर केले गेले. ईडीच्या सूत्रांनी मिररला दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपांपैकी तपासात असे काहीच समोर आलेले नाही. मात्र अद्याप तपास सुरू आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, सुशांतच्या कुटुंबाला वास्तविकतेत त्याच्या फायनान्स आणि त्याच्या व्यवहाराबद्दल विशेष माहिती नव्हती.

सुशांतच्या अकाउंटमधून रियासोबत कोणताच झाला नाही मोठा व्यवहारसूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, तपासातून समजले की, सुशांतने त्याच्या अकाउंटमधून जीएसटीसोबत इतर टॅक्स भरण्यासाठी २.७८ कोटी रुपये दिले होते. त्यांनी हेपण सांगितले की आता सुशांतच्या अकाउंटमधून गायब झालेल्या काही छोट्या अमाउंट्समधून समोर काहीच माहिती आली नाही की ती रक्कम कुठे, कोणाला आणि का दिली गेली. सूत्रांनी हीदेखील माहिती दिली की, सुशांतच्या अकाउंटमधून रिया चक्रवर्तीच्या अकाउंटमधून कोणताच मोठा व्यवहार झाला नाही. ईडीच्या तपासात ड्रग चॅट समोर आले होते ज्यानंतर एनसीबीने ड्रग्सच्या अँगलने तपास करायला सुरूवात केली होती.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत