Join us  

सुशांत सिंग रजपूत मृत्यूप्रकरणी NCB कडून मोठा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:49 PM

सुशांत सिंग रजपूतने आात्महत्या केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

ठळक मुद्देअद्याप काही बाबींची तपासणी करणे आवश्यक असल्याने आरोपपत्र सध्या तरी दाखल केले जाणार नाहीये. अनेकांच्या मोबाईलवरून मिळालेल्या एजन्सी इलेक्ट्रॉनिक डेटाचा अभ्यास देखील शिल्लक आहे.

अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या मृत्यू प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात NCB लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याच्या बातम्या मीडियात येत होत्या. पण आता या बातम्या चुकीच्या असल्याचे NCB ने म्हटले आहे. अद्याप काही बाबींची तपासणी करणे आवश्यक असल्याने आरोपपत्र सध्या तरी दाखल केले जाणार नाहीये. अनेकांच्या मोबाईलवरून मिळालेल्या एजन्सी इलेक्ट्रॉनिक डेटाचा अभ्यास देखील शिल्लक आहे. 

सुशांत सिंग रजपूतने १४ जानेवारी २०२० मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येने सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्याच्या आत्महत्येनंतर काही महिन्यांनी म्हणजेच ऑगस्टमध्ये NCB ने सुशांतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्जसंबंधी दोन गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर NCB ने सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक केले होते. सध्या दोघेही जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणात बॉलिवूडमधील सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोण, रकुल प्रीत यांसारख्या दिग्गज कलाकारांची चौकशी करण्यात आली होती. 

पोलीस सुशांत मृत्युप्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी करत असताना तिच्या मोबाईलवरून पोलिसांना काही चॅटिंग मिळाले होते. हे चॅट ड्रग्स सदर्भात असल्याने हे प्रकरण NCB कडे सोपावण्यात आले होते. सुशांत सोबत राहाणारे दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा, सुशांतची माजी मॅनेजर जयंती साहा यांसारख्या काही लोकांचीही या प्रकरणात नावं समोर आली होती.  

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत