Join us  

सुशांत सिंग प्रकरण : एक कॉल आणि डिलीट झाली मुंबई पोलिसांची ‘ती’ फाईल!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 3:31 PM

मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांनी फार सहकार्य मिळत नसल्याचेही आरोप होत आहेत. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देदिशा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिस दिशाच्या घरी पोहोचली. मात्र तिचे कुटुंब घरी आढळले नाही.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांची चौकशी सुरु असतानाच सुशांतचे वडील के के सिंग यांनी बिहार पोलिसांत एफआयआर दाखल केली आणि या प्रकरणाने अचानक कलाटणी घेतली. आता बिहार पोलिस या प्रकरणाची पाळेमुळे शोधत आहेत. मात्र यादरम्यान मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांनी फार सहकार्य मिळत नसल्याचेही आरोप होत आहेत. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांतची एक्स-मॅनेजर दिशा सालियन हिच्या आत्महत्येची फाईल अचानक डिलीट झाल्याचे कळतेय.‘आज तक’ने दिलेल्या वृत्ताुनसार, बिहार पोलिस सुशांत व त्याची एक्स-मॅनेजर दिशा यांच्या आत्महत्येचे कनेक्शन शोधत आहेत. दिशाने आत्महत्या केल्यानंतर काहीच दिवसांत सुशांतने आत्महत्या केली होती. अशात या दोन्ही प्रकरणात काही कनेक्शन आहे का? याचा शोध बिहार पोलिस घेत आहेत. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली, त्याच्या काही दिवस आधी त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियन हिने 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूप्रमाणेच दिशाच्याही मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

डिलीट झाली दिशा प्रकरणाची फाईल?

शनिवारी रात्री बिहार पोलिसांची टीम यासंदर्भात मालवणी पोलिस ठाण्यात पोहोचले. दिशाच्या आत्महत्येसंदर्भातील फाईल बिहार पोलिसांना हवी होती. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना ही फाईल देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र अचानक एक कॉल आला आणि या कॉलनंतर संबंधित फाईल अचानक ‘डिलीट’ झाली. होय, दिशा प्रकरणाचा तपशील असलेले फोल्डर चुकून डिलीट झाल्याचे मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांना सांगण्यात आले. इतकेच नाही तर हे फोल्डर पुन्हा मिळू शकत नाही, असेही सांगण्यात आले.आम्ही फोल्डर पुन्हा शोधण्यासाठी मदत करू शकतो, असे बिहार पोलिसांनी सांगितले. मात्र मुंबई पोलिसांनी आपले लॅपटॉप देण्यास नकार दिला. या केसपासून दूर राहा, असा सल्लाही कथितरित्या मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांच्या टीमला दिल्याचे कळते.

दिशाचे कुटुंबीयही ‘गायब’?दिशा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहार पोलिस दिशाच्या घरी पोहोचली. मात्र तिचे कुटुंब घरी आढळले नाही. आता बिहार पोलिस त्या चावीवाल्याला शोधत आहेत, ज्याने सुशांतच्या रूमचे कुलूप उघडले होते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत