Join us  

अन् कॉलेजने सुशांत सिंग राजपूतला काढले होते हॉस्टेलबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 12:30 PM

नुकताच सुशांत कपिल शर्मा शोमध्ये प्रमोशनसाठी आला. यावेळी सुशांतने कॉलेज लाईफमधील किस्सा ऐकवला.

ठळक मुद्देनीतेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा व सुशांत यांचा या चित्रपटात डबल रोल आहे.

सुशांत सिंग राजपूत सध्या ‘छिछोरे’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात सुशांत श्रद्धा कपूरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट काँलेज जीवनावर आधारित आहेत. साहजिकच, सध्या सुशांत जिथे जाईल तिथे त्याच्या कॉलेज लाईफचा उल्लेख होतोय.नुकताच सुशांत कपिल शर्मा शोमध्ये प्रमोशनसाठी आला. यावेळी सुशांतने कॉलेज लाईफमधील किस्सा ऐकवला. होय, चांगला विद्यार्थी अशी ओळख असूनही एकदा सुशांतला कॉलेजच्या होस्टेलमधून बाहेर काढले गेले होते. सुशांतने स्वत: हा किस्सा सांगितला.

त्याने सांगितले की, मी एक आदर्श विद्यार्थी होतो. दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकत होता. फर्स्ट सेमिस्टरमध्येच मला हॉस्टेलमधून बाहेर काढले गेले. कारण हॉस्टेलचा एक नियम होता. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर आलात तर हॉस्टेलवर एन्ट्री नव्हती. याचमुळे एकदिवस मला हॉस्टेलमधून बाहेर काढले गेले होते.

श्रद्धा कपूर हिनेही कॉलेज लाईफबद्दल सांगितले. ती म्हणाली की, चित्रपटात येण्याआधी मी माझे शिक्षण पूर्ण करू इच्छित होते. पण अचानक मी इतके उतावीळ झाले की, मी कॉलेज ड्रॉप करून फिल्मी दुनियेत आले. मग ऑडिशन्स, ऑफर्स असे सगळे सुरु झाले. यानंतर कॉलेज सोडण्याचा माझा निर्णय पक्का झाला. पण आज मला या निर्णयाचा पश्चाताप होतो.  नीतेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा व सुशांत यांचा या चित्रपटात डबल रोल आहे. याशिवाय वरूण शर्मा, प्रतिक बब्बर यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटात आमिर खान कॅमिओ करताना दिसणार आहे. सन २०१६ मध्ये प्रदर्शित नीतेश तिवारींच्या ‘दंगल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड तोडले होते. या चित्रपटानंतर नीतेश तिवारी ‘छिछोरे’ हा चित्रपट घेऊन येत आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतश्रद्धा कपूर