Join us  

सुशांतसिंग राजपूत आणि सारा अली खान पुढच्या महिन्यात सुरु करणार 'केदारनाथ'चे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 6:50 AM

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. केदारनाथ याचित्रपटातून ...

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. केदारनाथ याचित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री मारतेय. सुशांत सिंग राजपूतच्या अपोझिट ती दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक अभिषेक कपूर यांने सोशल मीडियावर सुशांत आणि साराचे चित्रपटाची स्क्रिप्ट वाचतानाच फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.   ALSO READ : सुशांतसिंग राजपूत अन् सारा अली खान कोणत्या विषयावर एवढी गंभीर चर्चा करीत असावेत?याचित्रपटाची शूटिंग 25 ऑगस्टपासून सुरु होणार होती मात्र निर्मात्यांनी याची तारीख पुढे ढकलली आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार आता 25 ऑगस्टऐवजी या चित्रपटाची शूटिंग 3 सप्टेंबरला सुरू होणार. फन्ने खान आणि केदारनाथची शूटिंग एकाच दिवशी सुरू करण्यात येणार आहे. सुशांत आणि सारा दोघेही चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. सध्या दोघेही दररोज चित्रपटाची स्क्रिप्ट वाचतायेत. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर असतील यात काही शंका नाही. नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर पण रिलीज करण्यात आले आहे. सारा आपल्या पहिल्या चित्रपटाताला घेऊन एक्साइटेड आहे. सुशांत सिंगने नुकतेच नासाला जाऊन त्याचा आगामी चित्रपट 'चंदा मामा दूर के'साठी ट्रेनिंग घेतले आहे. नासाला जाऊन ट्रेनिंग घेणारा तो पहिलाच भारतीय अभिनेता ठरला आहे.