Join us  

सुशांतच्या अकाऊंटंट रजतची CBIने केली चौकशी, रियाच्या एंट्रीनंतर गमावली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 1:49 PM

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण ईडीनंतर सीबीआयने रजत मेवातीची चौकशी केली आहे

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण ईडीनंतर सीबीआयने रजत मेवातीची चौकशी केली आहे. रजत मेवाती जानेवारी 2020पर्यंत सुशांतच्या अकाऊंटचे सगळे काम बघत होता. रजत सुशांतच्या जवळ होता. पण रिया चक्रवर्तीच्या एंट्रीनंतर परिस्थिती बदलली. रियाच्या एंट्रीनंतर अचानक रजतला नोकरी वरुन काढण्यात आले. आता सीबीआय ही संपूर्ण घटना जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे जेणेकरून सगळ्या गोष्टी कनेक्ट करता येतील. सुशांतच्या आर्थिक व्यवहाराबाबत सीबीआयने रजत मेवती यांच्याशी चर्चा केली आहे.

आजतकच्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या खात्यात जमा केलेली बरीच रक्कम गायब किंवा वेगवेगळ्या लोकांना ट्रान्सफर केली गेली आहे. सीबीआय हे पैसे कुठे गेले याचा शोध लावते आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी एफआयआरमध्ये सुशांतच्या खात्यातून पैसे हस्तांतरित केल्याचा आरोप केला आहे. सुशांतच्या वडिलांनी हा आरोप थेट रियावर लावला आहे. 

 

 रियाच्या एंट्रीने बदलल्या गोष्टीसुशांतच्या पूर्व अकाऊंटट रजत मेवातीने दावा केला आहे की रियाच्या एंट्री होण्याआधी सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या. तेव्हा सुशांतची टीम फॅमिलीसारखी होती. मात्र रिया चक्रवर्ती आल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या. एकदिवशी त्याला सांगण्यात आले की त्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. 

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत