Join us  

सर्जरीमुळे या अभिनेत्रीला ओळखणेही झाले कठीण, शॉर्ट हेअरमध्ये अभिनेत्रीचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 3:51 PM

तिच्या वाढदिवशी चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आनंद व्यक्त करत सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून सर्वांचे आभार मानले आहेत.

मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेनने नुकताच तिचा 46 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या सुष्मिताने तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिने तिचा नवा लूक चाहत्यांना दाखवला होता. वाढदिवसापूर्वी तिने चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केली होती आणि शॉर्ट हेअर कटही केला होता.तिचा हा नवा लूक पाहून चाहते लाईक्स कमेंट्स करत पसंती देत आहेत.  चाहत्यांसोबतच सेलेब्स देखील तिच्या या नव्या लुकचे कौतुक करत आहेत. 

व्हिडिओमध्ये सुष्मिता पसंती देणा-यांचे आभार मानत आहे. एकीकडे तिच्या लूकला पसंती मिळत असली तरी दुसरीकेड मात्र काही चाहत्यांना तिचा हा लूक अजिबात आवडलेला नाही. त्यामुळे कमेंट्स करत नापसंती  देत असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच काय तर काहींनी तर तिला ओळखणंही कठीण जात असल्याचे म्हटले आहे.

 व्हिडीओ शेअर करत सुष्मिताने सांगितले की, हा माझा नवीन लूक आहे. सध्या मी शस्त्रक्रियेतून बरी होत आहे. तुमच्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद. मी माझ्या शस्त्रक्रियेबद्दल सांगितले तेव्हा तुमच्यापैकी काहीजण नाराज झाले होते. पण मला सांगायचे आहे की, मी आता बरी आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. मला आशा आहे की तुम्हाला माझ्या नवीन लूकबरोबरच नवीन हेअरकटही आवडला असेल. 

तिच्या वाढदिवशी चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आनंद व्यक्त करत सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून सर्वांचे आभार मानले आहेत. तिने लिहिले- माझ्यावर मोठ्या संख्येने प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. मला अनेकांनी आशीर्वाद दिले. माझा वाढदिवस आणखी खास बनवला.

टॅग्स :सुश्मिता सेन