Join us  

सनी लिओनीचा केक चोरताना व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 10:54 AM

सनी लिओनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या मध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. नुकताच सनीने ट्विटरवर एक फनी व्हिडीओ शेअर केला आहे.

ठळक मुद्देया व्हिडीओत ती चक्क केक चोरताना दिसतेय सनी लिओनी आता साऊथ सिनेमांकडे वळली आहे

सनी लिओनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या मध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. नुकताच सनीने ट्विटरवर एक फनी व्हिडीओ शेअर केला आहे.ज्यात ती खूप मस्ती करताना दिसतेय. या व्हिडीओत ती चक्क केक चोरताना दिसतेय.

 सनीने हा व्हिडीओ तिच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे, 'मी काम करताना खूप मस्ती करते. तरी सुद्धा माझी टीम मला केकचा एक तुकडा खायला देत नाही. माझी टीम केक घेऊन जाते मात्र मला खायला देत नाही.'' सनीचा हा व्हिडीओ रेडियो मिर्चीचा ऑफिसमध्ये शूट करण्यात आला होता. यात ती केक आपल्या बॅगत ठेवताना पकडली जातेय.   

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सनी लिओनी आता साऊथ सिनेमांकडे वळली आहे. सनी लवकरच एका तामिळ चित्रपटात लीड रोलमध्ये दिसेल. या चित्रपटात सनीला साऊथ मेगास्टार ममूटीच्या अपोझिट साईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मल्याळम, कन्नड, तेलगू शिवाय हिंदीही रिलीज होणार आहे. सनीच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे, ‘मधुरा राजा’.सनी व ममूटी यांच्याशिवाय सुकुमराना, अतुल कुलकर्णी,पृथ्वीराज व शमा कासीम असे अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसणार आहे. अलीकडे सनी साऊथचा चित्रपट ‘वीरमादेवी’त दिसली होती. या चित्रपटातील सनीची भूमिका साऊथच्या प्रेक्षकांना भावली.

टॅग्स :सनी लिओनी