Join us

​सनी लिओनीचा खुलासा, लवकरच बनू शकते आई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 11:17 IST

अभिनेत्री सनी लिओनी सध्या वेगळेचं स्वप्न बघण्यात मश्गुल आहे. कुठल्याही विवाहितेला पडतं, ते सुकूमार स्वप्न सध्या सनी बघतेय. होय, ...

अभिनेत्री सनी लिओनी सध्या वेगळेचं स्वप्न बघण्यात मश्गुल आहे. कुठल्याही विवाहितेला पडतं, ते सुकूमार स्वप्न सध्या सनी बघतेय. होय, सनीला आई व्हायचे वेध लागले आहेत. हे आम्ही नाही, तर स्वत: सनीनेच म्हटले आहे.सनी तिच्या एका बयानामुळे सध्या बरीच चर्चेत आहे. आई होण्याबद्दल तिने एक मोठा खुलासा केला आहे. कदाचित सनी लवकरच पती डेनियलला गोड बातमी देऊ शकते. म्हणजेच, लवकरच सनी आई बनू शकते.ALSO READ : Shocking : आईच्या मृत्युस सनी लिओनी जबाबदार?एका मुलाखतीत सनीने स्वत: हा खुलासा केला आहे. शारिरीकदृष्ट्या आई बनने, माझ्यासाठी कठीण होऊ शकते. कारण सध्या माझ्या आयुष्यात बरेच काही घडते आहे. पण कोणास ठाऊक, काही दिवसांत माझ्या हातात तुम्हाला माझे बाळ दिसेल आणि सगळ्यांना धक्का बसेल. शेवटी हे बाळ आले कुठून, असा  प्रश्न सगळ्यांना पडेल, असे सनी म्हणाली. सनीच्या या बोलण्यावरून ती सरोगसीचे संकेत देत असल्याचे वाटतेय. याबद्दल थेट विचारल्यावर, मात्र ती वेगळेच काही बोलली. मी सरोगसीबद्दल फार श्योर नाही. खरे तर मला माहित नाही. माझ्या मते, परमेश्वर तुम्हाला अनेक क्षण देतो. यातील एक क्षण तुम्हाला पकडायचा असतो.  मला आई व्हायचे आहे, केवळ हेच खरे, असे ती म्हणाली. आता सनीच्या डोक्यात काय सुरु आहे. आई बनण्याबद्दल तिचे काय प्लानिंग आहे, हे तिलाच ठाऊक. पण प्लानिंग नक्कीच सुरु आहे. आई बनण्यासाठी सनी इतकी उत्सूक दिसते म्हटल्यानंतर, आपल्याला लवकरच गोड बातमी मिळणार, अशी आशा करूयात. लवकरच सनी  ‘बादशाहो’ या चित्रपटात आयटम डान्स करताना दिसणार आहे. आजकाल अनेक बॉलिवूड स्टार्स सरोगसीद्वारे आई-वडिल बनत आहेत. शाहरूखपासून तर करण जोहरपर्यंत अनेकजण सरोगसीद्वारे बाप बनले आहेत.