Join us  

जीममध्ये सनी लिओनीला ‘हा’ व्यक्ती देतोय त्रास; व्हिडीओ शेअर करून सांगितली व्यथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 1:11 PM

सनी आपल्या फिटनेसबद्दल खूपच अलर्ट असून, फिगर मेन्टेन्ड ठेवण्यासाठी ती नियमितपणे जीममध्ये जाणे पसंत करते. वर्कआउट करतानाचे तिने काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीचा एक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सनी जीममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. मात्र याच व्हिडीओच्या माध्यमातून तिने एक धक्कादायक बाबही सांगितली आहे. खरं तर सनी तिच्या फिटनेसविषयी खूपच अलर्ट असते. आपला फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी ती जीममध्ये प्रचंड मेहनत करीत असते. सनीने शेअर केलेल्या एका व्हिडीओवरून ही बाब तुमच्याही लक्षात येईल. व्हिडीओमध्ये सनी अतिशय हार्ड वर्कआउट करताना दिसत आहे. मात्र त्याचबरोबर ती तिची एक अडचणही चाहत्यांसोबत शेअर करीत आहे.  व्हिडीओमध्ये सनी एका मोठ्या आणि अवजड बॉक्सला ढकलताना दिसत आहे. एका अंतरावर हा बॉक्स ढकलत नेल्यानंतर सनी त्याच्या साहाय्याने वर्कआउट करताना दिसते. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सनीने लिहिले की, ‘हा बॉक्स खूपच वजनदार आहे, तो सहजपणे ढकलला जात नव्हता. पुढच्या वेळेस मला यापेक्षाही हलका बॉक्स हवाय...’ अर्थात तिची ही तक्रार असून, हे सर्व काही ती तिच्या जीम इन्स्ट्रक्टरला सांगत आहे. वर्कआउट करण्यासाठी जीम इन्स्ट्रक्टरकडून तिला अवघड टास्क दिले जात असल्याने ते करणे तिला असह्य होत असल्याचे ती सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. यावेळी सनीने वर्कआउट करतानाचे बरेचसे व्हिडीओ शेअर केले. एका व्हिडीओमध्ये तर ती चक्क जीम इन्स्ट्रक्टर मला खूप त्रास देत असल्याचे म्हटले आहे. अर्थात त्याच्याकडून मिळत असलेल्या अवघड टास्कमुळेच ती अशाप्रकारची तक्रार आहे.  दरम्यान, फिटनेससाठी सनी आपला अधिक वेळ जिममध्येच घालवते. जे अधिक व्यायाम करु न घेतील अशाच इन्स्ट्रक्टरकडे सनी जाणे पसंत करते. फिगर मेन्टेन राहावी, यासाठी इन्स्ट्रक्टर सनीला अनेक प्रकारचे व्यायाम शिकवतात.