Join us

सुनिती बनली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 16:19 IST

सुनीती चौहानने गेल्या अनेक वर्षांपासून अनेक हिट गाणी गायली आहे. सुनिती आता गायनानंतर अभिनयाकडे वळणार आहे. सुनीती प्लेइंग प्रिया ...

सुनीती चौहानने गेल्या अनेक वर्षांपासून अनेक हिट गाणी गायली आहे. सुनिती आता गायनानंतर अभिनयाकडे वळणार आहे. सुनीती प्लेइंग प्रिया या लघुपटात काम करणार आहे. लेकर हम दिवाना दिल या चित्रपटाचा दिग्दर्शक अारिफ अली या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. सुनितीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण अभिनय करणे ही गोष्ट मी इतकी एन्जॉय करू शकते हे मला या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यानच समजले. प्लेईंग प्रिया हा एक थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाची कथा एका गावातील आहे. या चित्रपटातील भूमिका सुनीतीला आवडल्याने या चित्रपटात काम करायचे असे तिने ठरवले असे आरिफ सांगतो.