Join us  

Suniel Shetty : सिनेमात नाही तर खऱ्या आयुष्यातही सुनील शेट्टी आहे 'हिरो'; १२८ मुलींना...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 9:25 AM

संकट आले की हिरो येऊन वाचवणार हे आपण सिनेमांमध्ये बघतो. पण सिनेमातील हिरो खऱ्या आयुष्यातही हिरो सारखा धावून आला तर कदाचित विश्वास बसणार नाही.

Suniel Shetty : संकट आले की हिरो येऊन वाचवणार हे आपण सिनेमांमध्ये बघतो. पण सिनेमातील हिरो खऱ्या आयुष्यातही हिरो सारखा धावून आला तर कदाचित विश्वास बसणार नाही. बॉलिवुडचा अण्णा म्हणजेच सुनील शेट्टीने १२८ मुलींना तस्करीपासून वाचवले (Human Trafficking) आणि सुखरुप घरी पोहोचवले आहे. ही घटना १९९६ ची आहे जी सुनील शेट्टीने कधीच उघड केली नव्हती.

समाजसेवा करणारे अनेक जण आपण बघतो पण काही असेही आहेत जे त्या कामाची वाच्यता होऊ देत नाही. बॉलिवुडमध्ये समाजसेवा करणारे अनेक जण आहेत मात्र सुनील शेट्टीचा अंदाज वेगळा आहे.त्याने अनेक चांगली कामे केली पण कधीच त्याचा गाजावाजा केला नाही. अशीच एक घटना आहे ज्यामध्ये त्याने १२८ मुलींना तस्करीपासून वाचवले होते.

ही घटना आहे १९९६ सालची. याबद्दल २४ वर्षांनंतर २०२० मध्ये एका सोशल मीडिया पोस्टमधून कळले. ५ जानेवारी १९९६ रोजी पोलिस आणि काही समाजसेवकांनी मुंबईतील कामठईपुरा या रेड लाईट एरियातील जबरदस्ती आणण्यात आलेल्या ४५६ मुलींची सुटका केली होती. या सर्व मुली १४ ते ३० वयोगटातील होत्या. यातील १२८ मुली नेपाळच्या होत्या. त्यापैकी ५० टक्के मुली अल्पवयीन होत्या. नेपाळ सरकारने या मुलींना देशात प्रवेश करण्यास मनाई केली. या मुलींजवळ जन्माचा दाखला नाही, नागकरिकता प्रमाणपत्र नाही या कारणामुळे त्यांना परवानगी नाकारली होती. नेपाळचे असल्याचा कोणताच पुरावा त्यांच्याकडे नव्हता. 

सुनील शेट्टी मदतीसाठी धावून आला 

यानंतर सुनील शेट्टी अगदी देवदूतासारखा त्यांच्या मदतीसाठी आला. त्याने सर्व १२८ मुलींचे काठमांडूचे प्लेन तिकिट बुक केले. तसेच सर्व जणी आपापल्या घरी सुखरुप पोहोचतील याची खबरदारी घेतली. सुनीलने कधीच कुठेच याचा उल्लेख आजपर्यंत केलेला नाही. ही गोष्ट तेव्हा समोर आली जेव्हा त्या नेपाळी मुलींमधील एका मुलीने इतके वर्षांनंतर समोर येऊन याचा खुलासा केला. चरिमाया तमांग (Charimaya Tamang)  असे त्या मुलीचे नाव. तिने सांगितले की त्या दिवशी सुनील शेट्टी यांनी आम्हाला वाचवले. चरिमाया आता एक एनजीओ मध्ये काम करते जे तस्करीमध्ये बळी पडलेल्या मुलींसाठी काम करते.

टॅग्स :सुनील शेट्टीमानवी तस्करीमुंबई पोलीस