Join us  

सुमीत कांत कौलचे 'पाखी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 6:05 PM

'पाखी' या सिनेमात सुमीत कांत कौल निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. 

ठळक मुद्देसुमीत कांत कौल 'पाखी' चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पणबालतस्करीवर आधारीत 'पाखी' चित्रपट

नाटक, लघुपटात काम केल्यानंतर आपले नशीब हिंदी सिनेसृष्टीत आजमवण्यासाठी अभिनेता सुमीत कांत कौल सज्ज झाला आहे. लवकरच तो 'पाखी' या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. 'पाखी' या सिनेमात तो निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. 

सुमीत कांत कौलचे आजोबा यशवंत पेठकर सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते आहेत. आता त्यांचा वारसा सुमीत पुढे चालवत आहे. बालतस्करीवर भाष्य करणाऱ्या 'पाखी' चित्रपटात तो निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सुमीतने बरेच वर्ष रंगभूमीवर काम केले असून वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. रोमांस करणाऱ्या तरूणापासून पासष्ट वर्षाच्या वयोवृद्ध माणसाची भूमिका देखील त्याने केली आहे. मात्र पाखी चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्याने निगेटिव्ह भूमिका केली आहे. जो लहान मुलांचे अपहरण करून बालविवाह व वेश्या व्यवसाय करण्यास त्यांना प्रवृत्त करताना दिसणार आहे.या चित्रपटाबद्दल सुमीत कांत कौल म्हणाला की,' प्रत्येक तासाला एका मुलाचे अपहरण होते. हे मुल तुमचे किंवा माझ्या जवळच्या कोणाचेतरी असू शकते. पाखी चित्रपट बालतस्करीवर आधारीत आहे आणि यात मी बाली नामक मुलांची तस्करी करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. तो शंभर रावणांच्या बरोबरीचा आहे. ही भूमिका साकारणे खूप आव्हानात्मक होती.''पाखी' चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. याबद्दल सुमीत कांत कौल म्हणाला की, पाखीच्या ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो आहे. या चित्रपटातून समाजासमोर वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा चित्रपटाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.'पाखी' चित्रपटातून सुमीत कांत कौल प्रेक्षकांना भुरळ पाडेल का, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.