Join us  

Subhash Ghai Birthday Special : OMG! सुभाष घईने केले होते सलमान खानच्या शूजवर मूत्रविसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 6:00 AM

सुभाष घई आणि सलमान खान यांच्यात अनेक वर्षांपूर्वी प्रचंड भांडणं झाली होती. ते दोघे एकमेकांशी बोलत देखील नसत. त्या दोघांमध्ये कोणत्या कारणांवरून भांडणे होती हे सलमाननेच २००२ साली दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.

ठळक मुद्देसलमानने पुढे सांगितले होते की, कधी कधी काही गोष्टी घडतात. ज्यामुळे आपला रागावर ताबा राहात नाही. एकदा त्याने मला चमच्याने मारले होते. एक प्लेट माझ्या चेहऱ्यावर अक्षरशः फोडली होती. एवढेच नव्हे तर त्याने माझ्या शूजवर मूत्रविसर्जन केले होते

सुभाष घई यांचा आज वाढदिवस असून ते प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. कर्ज, हिरो, विधाता, मेरी जंग, राम लखन, सौदागर, खलनायक, परदेस, ताल यांसारखे अनेक हिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले आहे. सुभाष घई यांच्या व्यवसायिक आयुष्याप्रमाणेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत आले होते. सलमान खानसोबतच्या त्यांच्या एका वादाची मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती. 

सुभाष घई आणि सलमान खान यांच्यात अनेक वर्षांपूर्वी प्रचंड भांडणं झाली होती. ते दोघे एकमेकांशी बोलत देखील नसत. त्या दोघांमध्ये कोणत्या कारणांवरून भांडणे होती हे सलमाननेच २००२ साली दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. २००२ मध्ये सलमान आणि ऐश्वर्या रायची प्रचंड भांडणे झाली होती. सलमान आणि ऐश्वर्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण नंतर त्यांच्यात दुरावा आला. सलमानने ऐश्वर्यावर हात देखील उचलला असल्याचे अनेक वर्तमानपत्रात छापून आले होते. या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना सलमानने सांगितले होते, मी तिला कधीच मारलेले नाही. मी जर भावूक झालो तर मी स्वतःला इजा करून घेतो. मी भिंतीवर माझे डोके आपटतो. मी दुसऱ्याला इजा करण्याचा कधी विचार देखील करू शकत नाही. मी केवळ सुभाष घईला एकदा मारले होते आणि त्याबाबत दुसऱ्याच दिवशी त्याची भेट घेऊन त्याची माफी देखील मागितली होती.

सलमानने पुढे सांगितले होते की, कधी कधी काही गोष्टी घडतात. ज्यामुळे आपला रागावर ताबा राहात नाही. एकदा त्याने मला चमच्याने मारले होते. एक प्लेट माझ्या चेहऱ्यावर अक्षरशः फोडली होती. एवढेच नव्हे तर त्याने माझ्या शूजवर मूत्रविसर्जन केले होते आणि माझी कॉलर देखील पकडली होती. त्यामुळे मला माझ्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे मी सुभाष घईवर हात उचलला होता. पण मी दुसऱ्या दिवशी जाऊन त्याची माफी देखील मागितली होती. सुभाष घई आणि सलमान मध्ये भांडणे झाल्यानंतर सलमानचे वडील सलीम खान यांनी दुसऱ्या दिवशी सुभाष घईला फोन केला होता आणि त्यानंतर तासा भराच्या आतच सलमानने जाऊन सुभाष घईची माफी मागितली होती. त्यामुळे ते प्रकरण तिथेच मिटले होते.

काही वर्षांनंतर सुभाष घईच्या युवराज या चित्रपटात सलमान खानने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात सलमानच्या नायिकेची भूमिका कतरिना कैफने साकारली होती. 

टॅग्स :सलमान खान