Join us

कहानी-डिअर जिंदगी येणार आमनेसामने ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 13:52 IST

 शाहरूख खानचा चित्रपट म्हटल्यास बॉक्स आॅफीसवर दोन चित्रपटांचा संघर्ष होणार नाही असे होणारच नाही. नाही का? आता शाहरूखचा आगामी ...

 शाहरूख खानचा चित्रपट म्हटल्यास बॉक्स आॅफीसवर दोन चित्रपटांचा संघर्ष होणार नाही असे होणारच नाही. नाही का? आता शाहरूखचा आगामी चित्रपट ‘डिअर जिंदगी’ चा फर्स्ट लुक नुकताच आऊट करण्यात आला आहे. या चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आलिया भट्टसोबत दिसणार आहे.चित्रपट गौरी शिंदे दिग्दर्शित असून २५ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. तसेच डिअर जिंदगी सोबत कहानीचा सिक्वेल हे एकसोबतच बॉक्स आॅफीसवर झळकणार आहेत. ‘कहानी’ च्या सिक्वेलमध्ये विद्या बालन आणि अर्जुन रामपाल हे असतील.शाहरूख-विद्या हे दोन गुणी कलाकार एकमेकांसमोर आल्यानंतर काय होईल ? याचा अंदाज आहे का? वेल, आता हे तर त्यांचे बॉक्स आॅफीस क्लॅशेस झाल्यानंतरच कळेल.