Join us  

बस्स...झाली कॉमेडी ! आता करायचेत सीरियस रोल - कार्तिक आर्यन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 5:33 PM

बॉलिवूडचा हॅण्डसम हंक अभिनेता कार्तिक आर्यनला आता गंभीर भूमिका करण्याचे वेध लागले आहेत.

ठळक मुद्दे कार्तिक आर्यनला आता गंभीर भूमिका करण्याचे लागलेत वेध कार्तिकचा लवकरच ‘लुकाछुपी’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्यार का पंचनामा, सोनू के टिटू की शादी या चित्रपटांमधून आपल्या विनोदी भूमिकांमधून रसिकांच्या मनावर छाप उमटविणारा हॅण्डसम हंक अभिनेता कार्तिक आर्यनला आता गंभीर भूमिका करण्याचे वेध लागले आहेत. आपल्या हलक्या फुलक्या पात्रांना मी खूप एन्जॉय केले. मात्र आता मला काहीतरी वेगळे करायला आवडेल, असे कार्तिक म्हणतो.

कार्तिकने यावेळी बोलताना व्हिलनची भूमिका साकारण्याची इच्छा देखील बोलून दाखवली. तो म्हणाला, “माझ्या मते कॉमेडी भूमिका साकारणे हे खूपच चॅलेंजिंग काम आहे आणि असे रोल साकारल्यानंतर जेव्हा प्रेक्षक तुमचा अभिनय एन्जॉय करत असतात तेव्हा खरंच खूप समाधान वाटते. तस पाहायला गेले तर मला पर्सनली खलनायकांच्या भूमिका पाहायला खूप आवडतात. जर मला अशी भूमिका मिळाली तर ती साकारायला मला नक्कीच आवडेल.”

कार्तिक आर्यनचा लवकरच ‘लुकाछुपी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन ही जोडी प्रथमच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांत या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज झालेत आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढली. आता ‘लुकाछुपी’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला असून या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दिनेश विजान निर्मित हा चित्रपट सिनेमेट्रोग्राफर लक्ष्मण उतेकरने दिग्दर्शित केला आहे. क्रिती व कार्तिकशिवाय अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसणार आहे. क्रिती कार्तिकचा हा रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा येत्या १ मार्चला प्रदर्शित होतोय.

टॅग्स :कार्तिक आर्यनक्रिती सनॉन