Join us  

​मुलगी खुशी आणि मनीष मल्होत्रासोबतचा श्रीदेवींचा ‘तो’ सेल्फी ठरला अखेरचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 3:43 AM

बॉलिवूडची पहिली सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने बॉलिवूडचं नव्हे तर अख्खा देश धक्क्यातून सावरणे बाकी आहे. दुबईत श्रीदेवींनी अंतिम श्वास ...

बॉलिवूडची पहिली सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने बॉलिवूडचं नव्हे तर अख्खा देश धक्क्यातून सावरणे बाकी आहे. दुबईत श्रीदेवींनी अंतिम श्वास घेतला. हृदयविकाराचा धक्का आला आणि यातच त्यांचे निधन झाले.मोहित मारवाह (बोनी कपूर यांचा भाचा)याच्या विवाह सोहळ्यात भाग घेण्यासाठी श्रीदेवी दुबईत गेल्या होत्या. अख्खे कपूर घराणे या सोहळ्यात हजर होते. श्रीदेवीही या विवाह सोहळ्यात सामील झाल्या होत्या.पती बोनी कपूर आणि लहान मुलगी खुशी त्यांच्यासोबत होते. मोठी मुलगी जान्हवी ही मात्र ‘धडक’ या आपल्या पहिल्या वहिल्या डेब्यू सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी असल्याने या सोहळ्याला हजर राहू शकली नव्हती. ALSO READ : सदमा!!! अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन या सोहळ्यात श्रीदेवी सगळ्यांसोबत एन्जॉय करताना दिसल्या होत्या. याक्षणांचे अनेक फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. पण या सर्व फोटोंमध्ये त्यांच्या एका सेल्फीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मुलगी खुशी आणि फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा यांच्यासोबतचा श्रीदेवी यांचा सेल्फी सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाली होता. पण हाच सेल्फी श्रीदेवींच्या आयुष्यातील अखेरची सेल्फी ठरला त्यांच्यासोबत सेल्फी घेणाºया मनीष वा खुशी यांना याचा अंदाजही नसेल. काळ इतक्या अनपेक्षित आणि इतक्या वेगाने त्यांच्यावर झडप घालेल, हे कुणाच्याच ध्यानीमनी नव्हते. खुद्द श्रीदेवींना तरी याची चाहुल लागली होती का? कोण जाणे!