Join us

​ श्रीदेवी -ऐश्वर्या राय यांनी मला नकार दिला! जाणून घ्या, कुठल्या नकाराबद्दल बोलतोय सनी देओल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 12:09 IST

सनी देओल एकेकाळचा रोमॅन्टिक हिरो. अर्थात सनीची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाहीच. आजही त्याचे अनेक चाहते आहेत. सनी सध्या ...

सनी देओल एकेकाळचा रोमॅन्टिक हिरो. अर्थात सनीची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाहीच. आजही त्याचे अनेक चाहते आहेत. सनी सध्या दोन गोष्टींमुळे चर्चेत आहे.एक म्हणजे, त्याचा आगामी चित्रपट ‘पोस्टर ब्वॉईज’ आणि दुसरे म्हणजे, सनीने बोलून दाखवलेले दु:ख. होय, दु:ख! सनीने अलीकडे एक दु:ख बोलून दाखवले आहे. सनीकडे आज आपले स्टारडम आहे. पण आपला वाईट काळ सनी विसरलेला नाही. हेच सनीचे दु:ख आहे. एक काळ असा होता की, मोठ्या अभिनेत्री माझ्यासोबत काम करायला तयार होईनात, असे सनीने अलीकडे एका मुलाखतीत सांगितले.ALSO READ : अनिल कपूरला बघताच सनी देओलचा व्हायचा संताप; सेटवरच दाबला होता गळा!बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींसोबत सनी फारसा दिसला नाही. असे का? नेमका हाच प्रश्न सनीला विचारण्यात आला. यावर सनीच्या आत रूतून बसलेले दु:ख बाहेर आले. माझ्या करिअरमध्ये मी कधीच मोठ्या हिरोईनसोबत दिसलो नाही. ‘घायल’साठी मी श्रीदेवीला विचारणा केली होती. पण तिला माझ्यासोबत काम करण्यात इंटरेस्ट नव्हता. यानंतर अन्य एका चित्रपटासाठी मी ऐश्वर्या रायला विचारले होते. पण तिनेही मला नकार दिला. मी अनेक मोठ्या अभिनेत्रींना अ‍ॅप्रोच झालो. पण कुणीच माझ्यासोबत काम करण्यास होकार दिला नाही. कदाचित मी चित्रपटात असल्यामुळे हा ‘मेल सेन्ट्रिक’ चित्रपट बनेल, असे त्यांना वाटले असावे, असे सनी म्हणाला.‘ढाई किलो का हाथ’ या डॉयलॉगसाठी प्रसिद्ध असलेला सनी देओलचा ‘पोस्टर ब्वॉईज’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हा चित्रपट २०१४ मध्ये याच नावाने आलेल्या मराठी चित्रपटाचा आॅफिशिअल रिमेक आहे. अभिनेता श्रेयस तळपदे याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यात  श्रेयस अ‍ॅक्टिंग करतानाही दिसणार आहे. बॉबी देओल हाही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.