Join us  

सोफिया हयातने म्हटले, ‘कंडोमची जाहिरात करून राखी सावंत सामाजिक कार्य करीत आहे’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 2:54 PM

मॉडेल, अभिनेत्री आणि नन बनलेल्या सोफिया हयात हिने कंडोमच्या जाहिरातीवरून आयटम गर्ल राखी सावंतने केलेल्या वक्तव्यांचे समर्थन केले आहे. ...

मॉडेल, अभिनेत्री आणि नन बनलेल्या सोफिया हयात हिने कंडोमच्या जाहिरातीवरून आयटम गर्ल राखी सावंतने केलेल्या वक्तव्यांचे समर्थन केले आहे. राखीची बाजू मांडताना सोफियाने म्हटले की, ‘ती खूपच चांगले काम करीत आहे. तिच्या जाहिरातीमुळे भारतीय जनतेला सेफ सेक्सविषयी माहिती मिळेल. भारतात अशाप्रकारे कंडोमच्या जाहिरातींवर बॅन लावले जात असल्यानेच देशात एड्सग्रस्तांची संख्या वाढत आहे. यावेळी सोफियाने हेदेखील स्पष्ट केले की, ननच्या रूपात कंडोमची जाहिरात करायला मला आवडेल. मॉडेल ते नन बनलेल्या सोफियाने राखीचे कंडोम जाहिरात प्रकरणावरून समर्थन करताना म्हटले की, ती एक सामाजिक काम करीत आहे. पुढे बोलताना सोफियाने म्हटले की, ‘राखीची जाहिरात कुठल्याही वेळेत प्रसारित व्हायला हवी. कारण ती कंडोमला कॉमेडी आणि मजेशीर अंदाजात विकताना दिसणार आहे. त्यामुळे प्रत्येकजण याकडे गंभीरतेने का बघत आहे? कंडोमची कित्येक वर्षांपासून विक्री केली जाते. सेक्सही कित्येक काळापासून केला जात आहे. अशात मला एक गोष्ट अजूनही कळाली नाही की, आपण याविषयी अजून का बोलत नाही? याविषयी जेवढे बिंधास्त बोलता येईल तेवढे आपण आपला मुलांमध्ये लैंगिक शिक्षणाविषयी प्रसार करू. असे केल्यास नको असलेली प्रेग्नेंसी आणि लैंगिक आजारावर नियंत्रण आणता येईल.’ पुढे सोफियाने म्हटले की, ‘सेक्स पवित्र आणि सुखद असायला हवे.’ यावेळी तिने राखीच्या कंडोम जाहिरातीला आतापर्यंत सर्वांत चांगली कंडोम जाहिरात असल्याचेही म्हटले. सोफियाने म्हटले की, मी पती, मॉडेल आणि वडिलांबरोबर कंडोमची जाहिरात करण्यासाठी कधीही तयार आहे. मला एक आध्यात्मिक ननच्या रूपात कंडोमची जाहिरात करण्याची इच्छा आहे. कारण या जाहिरातीच्या माध्यमातून मला एका पवित्र प्रेमाला प्रोत्साहन द्यायचे आहे. दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून कंडोमच्या जाहिरातींवर बंदी आणताना ही जाहिरात रात्री दहा ते सकाळी ६ वाजेदरम्यानच प्रसारित केली जावी, असे निर्देश दिले आहेत. सनी लिओनीच्या एका कंडोमच्या जाहिरातीला विरोध करणाºया व्यक्तीच्या याचिकेनंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. परंतु सरकारचा हा निर्णय राखी सावंतच्या फारसा पचनी पडला नाही. ती सातत्याने सरकारवर याविषयावर टीका करीत आहे. सरकार मला घाबरल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे राखीने म्हटले आहे. कारण सनी आणि बिपाशाच्या जाहिरातींवर आतापर्यंत अशाप्रकारचे निर्बंध नव्हते. परंतु मी जाहिरात करताच सरकारने हे निर्बंध का लादले? असा सवाल राखीने उपस्थित केला आहे.