Join us  

सोनू सूद पुन्हा बनला मसिहा, एक लाख लोकांना देणार नोकरी, बदलवणार 10 करोड लोकांचे आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 3:02 PM

सोनूच्या एका गोष्टीमुळे 10 करोड लोकांचे आयुष्य बदलणार आहे.

ठळक मुद्देसोनूने या ट्वीटद्वारे सांगितले आहे की, नवीन वर्ष.... नवीन स्वप्नं... नवीन नोकरीच्या संधी... आणि आम्ही आता तुम्हाला नोकरीची संधी देणार आहोत

सोनू सूद खऱ्या आयुष्यात देखील नायक असल्याचे त्याने लॉकडाऊनमध्ये सिद्ध केले आहे. त्याने लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांना मदत केली होती. तसेच तो गरिबांना अनेक मार्गांनी नेहमीच मदत करत असतो. आता तर त्याच्या एका गोष्टीमुळे 10 करोड लोकांचे आयुष्य बदलणार आहे.

सोनूने नुकतेच ट्विटरद्वारे त्याचा एक महत्त्वकांक्षी प्लान लोकांसोबत शेअर केला आहे. तो आता एक लाख लोकांना नोकरी देण्यासाठी एक प्लान आखत आहे. त्याच्या या ट्वीटमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने या ट्वीटद्वारे सांगितले आहे की, नवीन वर्ष.... नवीन स्वप्नं... नवीन नोकरीच्या संधी... आणि आम्ही आता तुम्हाला नोकरीची संधी देणार आहोत... गुडवर्कर हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करा आणि तुमचे भविष्य उज्जवल करा...

सोनूने या अ‍ॅप्लिकेशनला डाऊनलोड करण्यासाठी एक लिंक दिली आहे. या अ‍ॅपद्वारे 10 करोड लोकांचे आयुष्य बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नोकरी शोधणारे युवक सोनूचे हे ट्वीट पाहून प्रचंड खूश झाले आहेत. सोनूच्या या प्रयत्नसाठी अनेकांनी सोशल मीडियाद्वारे सोनूचे आभार मानले आहेत. 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातल्यानंतर अनेक देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. भारतात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर देशाच्या विविध भागात राहाणारे मजूर आपल्या घरात परतण्याचा प्रयत्न करू लागले होते. रेल्वे, बस यांसारखी सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेकांना चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अशा मजुरांना सोनू सुदने स्वतः खर्च करत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवले. त्यामुळे चित्रपटांमध्ये खलनायकाचे काम करणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात नायक बनला.

टॅग्स :सोनू सूद